जिद्द अन् चिकाटी काय असते ते सागरने दाखवून दिले! पाचव्या प्रयत्नात यशाला गवसणी..

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी जाहीर कऱण्यात आला. आयोगाकडून ९३३ उमेदवारांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. या यादात सागर ४४५ व्या क्रमांकावर आहे.

जिद्द अन् चिकाटी काय असते ते सागरने दाखवून दिले! पाचव्या प्रयत्नात यशाला गवसणी..
Sagar Kharade

एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क

यूपीएससी (UPSC) परीक्षेत एक-दोन प्रयत्नांतच अपयश आल्यानंतर अनेकजण खचून जातात. काही जण मग अभ्यास सोडून देतात. पण सागर खराडे (Sagar Kharade) या विद्यार्थ्याने एक-दोनवेळा नव्हे तर चारवेळा अपयश येऊनही हार मानली नाही. जिद्दीने अभ्यास करत राहिला आणि अखेर त्याच्या कानावर मंगळवारी आनंदवार्ता पडली. चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर सागरने यूपीएससी परीक्षेत यश मिळवत देशात ४४५ वा क्रमांक पटकावला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी जाहीर कऱण्यात आला. आयोगाकडून ९३३ उमेदवारांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. या यादात सागर ४४५ व्या क्रमांकावर आहे. सागर हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार या गावचा. त्याने पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी असल्याने त्याने २०१५ ते १०१८  काळात इंजिनिअर म्हणून नोकरीही केली.

हेही वाचा : UPSC Result : देशातील शंभर टॉपर्सची नावे पहा एका क्लिकवर, मुलींनी मारली बाजी

सागरचे आईवडील शेतकरी करत असून त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे त्याला नोकरीहीचा पर्याय निवडावा लागला होता. नोकरी करत असताना नागरी सेवेत येण्याची इच्छा अपूरी राहिल्याची खंत वाटत असे. अखेर त्याने २०१८ मध्ये चांगल्या पगाराची नोकरी सोडून यूपीएससीचा अभ्यास करायचा निर्णय घेतला.

याविषयी ‘एज्युवार्ता’शी बोलताना सागर म्हणाला, २०२२ मध्ये दिलेली परीक्षा पाचवा प्रयत्न होता. या आधीही दोनदा मुलाखतीपर्यंत पोहचलो होतो. परंतु दोन्हीवेळा अपयश आले. परंतु खचून न जाता आत्मविश्वासाने प्रयत्न चालू ठेवले. ही तिसरी मुलाखत होती आणि यावेळी मात्र कष्टाचे फळ मिळाल्याची भावना सागरने व्यक्त केली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2