आता बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएमला सीईटी बंधनकारक ; अर्ज नोंदणीस उद्यापासून सुरुवात 

बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटीसाठी गुरुवार २१ मार्चपासून अर्ज नोंदणीसाठी सुरुवात.

आता बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएमला सीईटी बंधनकारक  ; अर्ज नोंदणीस उद्यापासून सुरुवात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic Years 2024-25) करीता बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम या (Graduate and Post Graduate Course) अभ्यासक्रमाच्या  प्रवेशाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षामार्फत सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याकरीता गुरुवार २१ मार्चपासून अर्ज नोंदणीला सुरुवात केली जाणार (Application Registration Start) आहे. महा-बी. बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम (Maha-B.BCA/BBA/BMS/BBM) सीईटी २०२४ सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे.चालू शैक्षणिक वर्षांपासून  बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम हे अभ्यासक्रम एआयसीटीईने आपल्या कक्षेत घेतले आहेत.त्यामुळे या अभ्यासक्रमाना सीईटी लागू करण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्षे २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्याअनुषंघाने या शैक्षणिक वर्षापासून बीसीए /बीबीए/बीएमएस/बीबीएम या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. उमेदवार/पालक/संबंधित संस्था यांच्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

महा-बी. बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ या सामाईक प्रवेश परीक्षेचा दिनांक निश्चित झाल्यानंतर उमेदवार व पालकांच्या माहितीसाठी संकेतस्थाळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक असणार आहे. 

अर्ज कसा करावा

सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्या. होम पेजवर दिलेला बीसीए /बीबीए/बीएमएस/बीबीएम CET टॅब निवडा. नोंदणी लिंकवर क्लिक करा. उमेदवारांना नोंदणी पुर्ण करावी लागेल. महत्त्वाची ओळखपत्रे भरून फॉर्म पूर्ण करा आणि कागदपत्रे सबमिट करा. आवश्यक फी भरा आणि पेमेंट पावती डाउनलोड करा.