NEET UG साठी हॉल तिकिट प्रसिद्ध

NTA तर्फे 5 मे रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 5.20 या वेळेत परीक्षा घेतळी जाणार आहे.

NEET UG साठी हॉल तिकिट प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरूवारी (दि. 2 ) National Eligibility-cum-Entrance Test ( NEET UG ) साठी हॉल तिकिट प्रसिध्द केले आहे. नोंदणीकृत उमेदवार अधिकृत वेबसाइट Exams.nta.ac.in/NEET/ द्वारे त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

NTA तर्फे 5 मे रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 5.20 या वेळेत परीक्षा घेतळी जाणार आहे. भारताबाहेरील 14 शहरांसह देशभरातील 557 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. देशभरातून  24 लाखांहून अधिक उमेदवारांनी  NEET UG  परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. NEET UG 2024 मराठी, आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, , उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या 13 भाषांमध्ये आयोजित केले जाईल.

 कोणत्याही उमेदवाराला NEET हॉल तिकिट डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल, तर ते 011-40759000 वर NTA शी संपर्क करू शकतात. याशिवाय उमेदवार neet@nta.ac.in वर ई-मेल देखील पाठवू शकतात.
 
NEET UG 2024 हॉल तिकिट कसे डाऊनलोड करावे?


* सर्व उमेदवार प्रथम अधिकृत वेबसाइट-(Exams.nta.ac.in) वर जा.
* मुख्यपृष्ठावरील NEET UG प्रवेश पत्र लिंकवर क्लिक करा.
* आपले लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
* हॉल तिकिट तपासा आणि डाउनलोड करा.
*हॉल तिकिट प्रिंट काढा.