IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत ९९९५ पदांची भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRB) गट A अधिकारी (स्केल 1, 2 आणि 3) आणि गट B ऑफिस असिस्टंटच्या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत ९९९५ पदांची भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बँकिंग कर्मचारी निवड संस्थेने (IBPS) विविध ग्रामीण बँकांमध्ये भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRB) गट A अधिकारी (स्केल 1, 2 आणि 3) (RRB Group A Officer Scale 1, 2 & 3) आणि गट B ऑफिस असिस्टंटच्या पदांच्या भरतीसाठी (Recruitment of Office Assistant Posts) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू (Start the online application process) झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयबीपीएस आरआरबी भरती 2024 साठी संस्थेच्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

प्रोबेशनरी ऑफिसर आणि लिपिक यांसारख्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून बॅचलर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अधिकारी स्केल-III साठी, उमेदवाराचे वय 21 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे, तर अधिकारी स्केल-II साठी, वयोमर्यादा 21 वर्षे ते 32 वर्षे आणि अधिकारी स्केल-I साठी, उमेदवारांचे वय 18 वर्षे ते 30 वर्षे असावे. ऑफिस असिस्टंट- लिपिक (बहुउद्देशीय) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्षे असावे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PWD) श्रेणीतील उमेदवारांना ऑफिस असिस्टंट आणि आरआरबी ऑफिसर परीक्षासाठी अर्ज शुल्क 175 रुपये आहे. तर इतर सर्व उमेदवारांना दोन्ही परीक्षेसाठी 850 रुपये परीक्षा शुल्क भरावा लागणार आहे. 

आयबीपीएस आरआरबी भरती 2024 द्वारे एकूण 9 हजार 995 पदे भरली जातील. ज्यामध्ये 5 हजार 585 बहुउद्देशीय कार्यालय सहाय्यक पदांचा समावेश आहे. आरआरबी भरती परीक्षा 22 जुलै ते 27 जुलै 2024 या कालावधीत घेतली जाईल. आयबीपीएस विविध प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील ऑफिस असिस्टंटच्या गट A पदांच्या (स्केल 1, 2 आणि 3) आणि गट B पदांच्या भरतीसाठी CRP RRB XIII भरती परीक्षा आयोजित करेल. आयबीपीएस लिपिक पदासाठी, उमेदवारांची निवड प्राथमिक आणि मुख्य परीक्षेद्वारे केली जाईल, तर पीओ (PO) पदासाठी, निवड ही प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीवर आधारित असेल.

आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर आणि लिपिक पदासाठी प्राथमिक परीक्षा 3, 4, 10, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. पीओ मुख्य परीक्षा 29 सप्टेंबर रोजी तर लिपिक मुख्य परीक्षा 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आयबीपीएस अधिकारी ग्रेड 2 आणि 3 साठी एकल मुख्य परीक्षा देखील 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. अधिकृत सूचनेनुसार, आयबीपीएस 22 जुलै ते 27 जुलै दरम्यान पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) आयोजित करेल. शेवटी कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी होईल.