रँगिंगप्रकरणी एकाचवेळी तब्बल ७२ विद्यार्थ्यांवर कारवाई; दहा जण निलंबित

IIT मंडी मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत रॅगिंगचे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी दोषी ७२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी १० विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

रँगिंगप्रकरणी एकाचवेळी तब्बल ७२ विद्यार्थ्यांवर कारवाई; दहा जण निलंबित

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयाच्या (Higher Education Ministry) वतीने नुकतेच  देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये होणाऱ्या रॅगिंग (Ragging) विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर आता  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मंडीने (IIT Mandi) मोठी कारवाई केली आहे. 

 

IIT मंडी मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत रॅगिंगचे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी दोषी ७२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी १० विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

देशातील विद्यापीठांमधील मनुष्यबळ विकास केंद्रांच्या नावात बदल; धमेंद्र प्रधान यांची घोषणा 

संस्थेतील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला सिनिअर विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गात पार्टीचे निमित्त सांगून बोलावले. तिथे त्याला कोंबडा होण्यास सांगून कित्तेक तास भिंतीकडे तोंड करून बसण्यास सांगितले.  सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी विद्यार्थ्यांची ओळख पटली. हे प्रकरण अँटी रॅगिंग समितीकडे गेले.

 

तपासात आरोप खरे आढळल्यास निलंबन, वसतिगृह सोडण्याची,  आणि दंड आकारण्याची शिफारस अँटी रॅगिंग समितीने केली होती. त्याआधारे आरोपी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  आरोपी ७२ विद्यार्थ्यांना  प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

 

सर्व आरोपींच्या पालकांना संस्थेत बोलावण्यात आले. यापैकी १० विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी विद्यार्थ्यांपैकी ३ विद्यार्थी हे विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी होते. त्यांना संबंधित पदांवरून हटवण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j