...दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार नाही

12 th , 10 th exam , ssc ,hsc ,board

...दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार नाही


पेपर फुटीच्या घटनांना प्रतिबंध घालता यावा.तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉफी मुक्त वातावरणात सुरळीतपणे पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला होता. मात्र त्यानंतर इयत्ता दहावी -बारावीच्या प्रश्नपत्रिका मोबाईलवर वायरल होत असल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे पेपर फुटल्याच्या अफवा पसरत होत्या. परिणामी विद्यार्थी व पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळे राज्य मंडळांनी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याची सुविधा रद्द केली आहे.
     महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षांचे आयोजन कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी दृकश्राव्य माध्यमाद्वारे शुक्रवारी बैठक घेण्यात आली.  या बैठकीस पोलीस महासंचालक, अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, राज्याचे शिक्षण आयुक्त, राज्य मंडळाचे अध्यक्ष, तसेच सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय मंडळाचे अध्यक्ष आदी  उपस्थित होते.या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.