'एससीईआरटी' च्या संचालक पदी अमोल येडगे

एससीईआरटीच्या संचालक पदी अमोल येडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येडगे हे यापूर्वी यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

'एससीईआरटी' च्या संचालक पदी अमोल येडगे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क


महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) संचालक पदी अमोल येडगे (amol yedge) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येडगे हे यापूर्वी यवतमाळ येथे जिल्हाधिकारी (collector of Yavatmal) म्हणून कार्यरत होते.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही संस्था शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देण्याबरोबरच अभ्यासक्रम तयार करण्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. गेल्या काही कालावधीपासून कौस्तुभ दिवेगावकर हे प्रशिक्षण परिषदेचे संचालक म्हणून काम पाहत होते.
   महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालक पदी शिक्षण क्षेत्रातील अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात होती. परंतु, गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागातील पदोन्नती रखडली आहे. त्यामुळे संचालक पदासाठी पात्र असणारे शिक्षण विभागातील अधिकारी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे काही वर्षांपासून परिषदेच्या संचालक पदी आयएएस दर्जाचे अधिकारी नियुक्त केले जात आहेत.