फॅशन इंडस्ट्रीचे आकर्षण असेल तर मग करिअरच करा! अनेक संधी अन् पैसाही...

फॅशन इंडस्ट्री मध्ये करिअर साठी खूप वाव आहे. यामध्ये एखादा व्यक्ती एक मशीन घेऊन सुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो.

फॅशन इंडस्ट्रीचे आकर्षण असेल तर मग करिअरच करा! अनेक संधी अन् पैसाही...
Career in Fashion Industry

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Career Tips : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत त्यांना त्यांच्या बूट-चपलांपासून केसांना लावणाऱ्या बँड, कल्चर पर्यंत सगळे काही फॅशनेबल, ट्रेंडी असावे असे वाटत असते. फॉर्मल, इन्फॉर्मल, पार्टीवेअर, ट्रेडिशनल वेअर असे सगळे फॅशनेबल सध्याच्या ट्रेंडनुसार असावे अशीच सर्वांची इच्छा असते. अशा सर्वांना हव्या हव्याशा वाटणाऱ्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये (Fashion Industry) करिअर घडू शकते का, त्यासाठी काय करता येईल अशा सर्व प्रश्नांची उत्तरे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या 'स्कुल ऑफ फॅशन टेक्नोलॉजी' (SOFT) च्या संचालिका डॉ. मंजू हुंडेकर (Dr. Manju Hundekar) यांनी दिली. 

'एज्युवार्ता' शी बोलताना डॉ. हुंडेकर म्हणाल्या, फॅशन इंडस्ट्री मध्ये करिअर साठी खूप वाव आहे. यामध्ये एखादा व्यक्ती एक मशीन घेऊन सुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो. तर एखादे नामांकित फॅशन हाऊजमध्ये वर्षाला लाखो-करोडो रुपयांची उलाढालही होऊ शकते. एखाद्या फॅशन स्कुल मध्ये औपचारिक शिक्षण घेतलेले उमेदवार  बुटीक मध्ये, एखाद्या फॅशन इन्स्टिटयूट मध्ये, एखाद्या ब्रँडमध्ये चांगली नोकरी करू शकतात किंवा स्वतःचा व्यवसायही सुरु करू शकतात. 

‘या’ खासगी विद्यापीठांच्या शुल्कात मिळेल ५० टक्के सवलत; पुण्यात सर्वाधिक, पाहा संपूर्ण यादी

महिन्याला लाखापर्यंत मिळू शकतो पगार

या क्षेत्रात सुरुवातीच्या काळात एखादी छोटी नोकरी करून  १५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो तर चांगल्या ब्रँडमध्ये ५० ते ६० हजार रुपयांपर्यंतचाही पगार मिळू शकतो. या क्षेत्रात ५ वर्षांच्या अनुभवानंतर महिन्याला १ लाख रुपयांपेक्षा जास्त सुद्धा पगार मिळू शकतो. 

फॅशन इंडस्ट्री ब्रँड, हाय एन्ड फॅशन आणि स्ट्रीट फॅशन अशा  तीन भागांमध्ये विभागलेली आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी १० वी नंतर डिप्लोमा कोर्स किंवा १२ वी  नंतर ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करता येतो. फॅशन डिझाइनिंग हा कोर्स  इंजिनिअरिंग आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाच्या तोडीचा असल्याचे डॉ. हुंडेकर यांनी सांगितले.

11th admission : नॉन क्रिमी लेअर नसले तरी अकरावीत प्रवेश

विद्यार्थ्यांचा वाढतोय कल

सोशल मीडिया, टीव्ही, चित्रपट यामुळे या क्षेत्राला मिळणारे एक्स्पोजरही चांगले आहे. त्यामुळे आता पालक आणि विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे कल वाढत आहे. चित्रकला, क्रिएटिव्हिटी, तंत्रज्ञान, शास्त्र, गणित या सर्व विषयांचा अंतर्भाव या क्षेत्रात आहे. त्यामुळे या विषयांचे ज्ञान असणारे कुणीही या क्षेत्रात चांगले करिअर घडवू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo