SPPU News : विद्यापीठातील अनेक विभाग पडणार ओस, २५ अभ्यासक्रमांना जागांपेक्षा कमी अर्ज

विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यासाठी सध्या ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी १४ जुलैपर्यंत दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

SPPU News : विद्यापीठातील अनेक विभाग पडणार ओस, २५ अभ्यासक्रमांना जागांपेक्षा कमी अर्ज
Savitribai Phule Pune University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) विविध विभागांमध्ये चालणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश (Admission Process) मिळविण्यासाठी पूर्वी विद्यार्थ्यांची झुंबड उडायची. पण मागील काही वर्षांत हे बदलले आहे. सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल २५ अभ्यासक्रमांना (Courses in SPPU) प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज आले आहेत. तीन अभ्यासक्रमांना तर एकही अर्ज आलेला नाही. मराठीसाठीच्या (Marathi Admission) ६० जागांसाठीही केवळ ७० अर्ज आले आहेत

विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यासाठी सध्या ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी १४ जुलैपर्यंत दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पण आतापर्यंत विविध अभ्यासक्रमांसाठी आलेल्या अर्जांची स्थिती चिंताजनक असल्याचेच दिसत आहे. जवळपास ८० अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे.

अखेर ‘फार्मसी’ची प्रवेश प्रक्रिया सुरू; सीईटी सेलकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर

ज्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त होतील, त्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर गुणवत्तेच्याआधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज असतील तर परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीत २५ अभ्यासक्रमांना क्षमतेपेक्षा कमी अर्ज आले आहे. पुढील दोन दिवसांत अर्ज संख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

इंडियन लॉजिक अन्ड एपिस्टेमॉलॉजी, एमए प्राकृत आणि एमटेक इन सायन्टिफिक इंस्ट्रुमेंटेशन या अभ्यासक्रमांसाठी एकही अर्ज आलेला नाही. ललित कला केंद्रातील नृत्य, नाट्य व संगीत, भाषा विभागातील फ्रेंच, जर्मन, रशियन तसेच पाली, योगा, साहित्य हिंदी, बुध्दिस्ट स्टडीज या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे. तंत्रज्ञान विभागातील चार अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.

आयुष करणार कोट्यातील प्रवेशासाठी समुपदेशन; बी. जे. मेडिकल कॉलेजचाही समावेश

एमए मराठीसाठी एकूण ६० जागा असून केवळ ७० अर्ज प्राप्त झाले आहेत. तर इंग्रजीसाठी मात्र ३४६ अर्ज आले आहेत. संरक्षणशास्त्र विषयाकडेही विद्यार्थ्यांचा कमी ओढा दिसतो. सर्वाधिक दोन हजारांहून अधिक अर्ज एमएसस्सी रसायनशास्त्र या अभ्यासक्रमासाठी आहेत. या अभ्यासक्रमाच्या केवळ १३५ जागा आहेत. त्यापाठोपाठ, एमएसस्सी इन कॉम्प्युटर सायन्स, माक्रोबायोलॉजी, व्हायरॉलॉजी यांसह अन्य काही विज्ञान विद्याशाखेच्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याचे दिसते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD