National Teacher Award : राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया सुरू, ही आहे पात्रता...

शिक्षकांनी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय पुरस्कार देऊन अशा शिक्षकांना सन्मान्मित केले जाते. राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्कारांचे वितरण होते.

National Teacher Award : राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया सुरू, ही आहे पात्रता...
National Awards to Teachers 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून (Education Ministry) यावर्षीच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठीची (National Awards to Teachers) निवड प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार पात्र शिक्षकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. किमान दहा वर्षे सेवा असलेले केवळ नियमित शिक्षकच या पुरस्कारासाठी पात्र आहेत. कंत्राटी तत्वावरील शिक्षकांना पुरस्कारासाठी (NAT 2023) अर्ज करता येणार नाही, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षकांनी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय पुरस्कार देऊन अशा शिक्षकांना सन्मान्मित केले जाते. राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्कारांचे वितरण होते. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र शिक्षकांना ऑनलाईन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, कामाची छायाचित्रे, कामाचा अहवाल, ध्वनीचित्रफिती, चित्रफीत आदी सादर करावे लागणार आहे.

11th Admission : अकरावीच्या दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर, अर्ज भरण्यास सुरूवात

पुरस्कार निवड प्रक्रियेचे वेळापत्रक

दि. २३ जून ते १५ जुलै - शिक्षकांकडून स्व-नामांकन व ऑनलाईन अर्जासाठी वेब पोर्टल सुरू

दि. १६ ते २५ जुलै - जिल्हा/प्रादेशिक निवड समितीकडून राज्य निवड समितीला ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज पाठविणे

दि. २६ जुलै ते ३ ऑगस्ट – राज्य निवड समितीने निवडलेल्या शिक्षकांची यादी राष्ट्रीय परीक्षकांकडे पाठविणे

दि. ४ व ५ ऑगस्ट – शॉर्टलिस्ट केलेल्या शिक्षकांना राष्ट्रीय परीक्षकांसमोर सादरीकरणाबाबत कळविणे

दि. ७ ते १४ ऑगस्ट – परीक्षकांकडून निवड प्रक्रिया

दि. १४ ऑगस्ट – राष्ट्रीय परीक्षकांकडून पुरस्कारांसाठी शिक्षकांची नावे निश्चित करणे

दि. १६ ते १८ ऑगस्ट – पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना कळविणे

दि. ५ सप्टेंबर – पुरस्कार वितरण

शिक्षकांना 'गुड टच बॅड टच'चे प्रशिक्षण देण्याचे निर्देश; आठवड्यातील किमान दोन तास राखीव

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी पात्रता

  • राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थां, अनुदानित, राज्य मंडळांशी संलग्नित खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक.
  • केंद्रीय विद्यालये (KVs), जवाहर नवोदय विद्यालय (JNVs), संरक्षण मंत्रालय (MoD) द्वारे चालवल्या जाणाऱ्या सैनिक शाळा, अणुऊर्जा शिक्षण संस्था (AEES) द्वारे चालवल्या जाणार्‍या शाळा आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणार्‍या एकलव्य मॉडेल निवासी शाळे (EMRS) तील शिक्षक.
  • सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) शी संलग्न शाळांमधील शिक्षक
  • कौन्सिल फॉर इंडियन स्कूल्स सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) शी संलग्न शाळांमधील शिक्षक.
  • सामान्यतः सेवानिवृत्त शिक्षक पुरस्कारासाठी पात्र नसतात. परंतु ज्या शिक्षकांनी शैक्षणिक वर्षातील किमान चार महिन्यांसाठी म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार ज्या वर्षाशी संबंधित आहे त्या वर्षीच्या ३० एप्रिलपर्यंत सेवा केली असेल आणि इतर अटींची पुर्तता होत असलेले शिक्षक.
  • शैक्षणिक प्रशासकीय अधिकारी, शिक्षण निरीक्षक आणि प्रशिक्षण संस्थांमधील कर्मचारी पात्र नाहीत
  • किमान दहा वर्षे सेवा असलेले केवळ नियमित शिक्षक आणि शाळांचे प्रमुख पात्र आहेत.
  • कंत्राटी शिक्षक आणि शिक्षक मित्र पात्र असणार नाहीत.

पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी लिंक -  https://nationalawardstoteachers.education.gov.in/new_user.aspx

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2