सीबीएसईच्या इयत्ता दहावी - बारावीच्या परीक्षांचे हॉल तिकीट लवकरच

सीबीएसईच्या इयत्ता दहावी - बारावीच्या परीक्षांचे हॉल तिकीट लवकरच

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डातर्फे इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून येत्या १५ फेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षेसाठी आवश्यक असणारे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

     विद्यार्थ्यांना cbse.gov.in या संकेतस्थळावरून हॉल तिकीट डाऊनलोड करून घेता येईल. हॉल तिकिटावर परीक्षा केंद्रासह परीक्षा दरम्यान कोणती काळजी घ्यावी या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला असेल त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व बाबींचे वाचन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.