मुंबई सशस्त्र पोलीस भरती मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध

नवीन वेळापत्रकानुसार ३, ४, ५, ६, ८ आणि ९ जुलै रोजी ही मैदानी चाचणी पार पडणार आहे. नैसर्गीक व तांत्रिक अडचणीमुळे यापुर्वीच्या मैदानी चाचणी वेळापत्राकात बदल करण्यात आले असून शारीरीक चाचणीचे सुधारीत वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे

मुंबई सशस्त्र पोलीस भरती मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२२-२३ (Mumbai Armed Police Constable Recruitment 2022-23) च्या मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध (Revised schedule of Ground test released) करण्यात आले आहे.  नवीन वेळापत्रकानुसार ३, ४, ५, ६, ८ आणि ९ जुलै रोजी ही मैदानी चाचणी पार पडणार (The Ground test will be conducted on July 3, 4, 5, 6, 8 and 9) आहे. नैसर्गिक व तांत्रिक अडचणीमुळे यापुर्वीच्या मैदानी चाचणी वेळापत्राकात बदल करण्यात आले आहेत.आता शारीरिक चाचणीचे सुधारीत वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ११, नवी मुंबई कार्यालयाचे आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ करीता दिनांक २० जून रोजी सकाळी ५ वाजता उपस्थित राहिलेल्या उमेदवार यांचे ओळखपत्र तपासणी करून बायोमॅट्रीक व छाती उंची मोजमाप घेवुन पहिली डिटेल साडे पाच वाजता गोळाफेक मैदानावर पाठविण्यात आली. परंतु, मैदानी चाचणी दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने गोळाफेक मैदान व १०० मीटर धावणे ट्रॅकवर चिखल झालेला आहे. त्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू करता आली नाही. 

सद्यस्थितीत हवामान व प्रर्जन्यवृष्टीमुळे मैदानी चाचणी पूर्ण होईल, याची शाश्वती देता येत नाही. या कारणास्तव मैदानी चाचणी भरती प्रक्रीया पुर्ण करणे शक्य नाही. नैसर्गीक व तांत्रिक अडचणीमुळे खालील प्रमाणे यापुर्वीचे मैदानी चाचणी वेळापत्राकात बदल करण्यात आला असून शारीरिक चाचणीचे सुधारीत वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.