विद्यार्थ्यांना घराजवळ इंटरशिपची संधी; विद्यापीठाकडून 'इंटरशिप पोर्टल'चे अनावरण 

रोजगार व उद्योजक क्षमता वाढवता यावी या अनुषंघाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'इंटरशिप पोर्टल'चे अनावरण विद्यापाठीपचे कुलगुरु प्रा. डाॅ. सुरेश गोसावी याच्या हस्ते करण्यात आले

विद्यार्थ्यांना घराजवळ इंटरशिपची संधी; विद्यापीठाकडून  'इंटरशिप पोर्टल'चे अनावरण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आयुष्यातील अनेक वर्षे शिक्षणासाठी खर्च करुन देखील, कुठे नोकरीसाठी रुजू होयचे असेल तर काही महिने किंवा वर्ष प्रशिक्षण घ्यावे लागते. मात्र, आता पुणे विद्यापीठाने नवीन उपक्रम (New Activities) सुरु केला आहे. यामुळे विद्यार्थ्यी शिक्षण घेत असताना त्यांच्यातील रोजगार व उद्योजक क्षमता वाढवता यावी या अनुषंघाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे  (Savitribai Phule Pune University) 'इंटरशिप पोर्टल'(Intership Portal) सुरू करण्यात आले. या पोर्टलचे अनावरण विद्यापाठीपचे कुलगुरु डाॅ. सुरेश गोसावी (Chancellor Suresh Gosavi) याच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 

नवीन शैक्षणिक धोरणात विविध अभ्यासक्रमामध्ये इंटर्नशिप, ऑन द जाॅब ट्रेनिंग अशा विविध नव्या संकल्पना येवू घातल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापाठांना इंटर्नशिप कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्योग, व्यवसाय, सहकारी संस्था, एनजीओ अशा सर्व संस्थांमार्फत विद्यार्थ्यांसाठी वेगवेळ्या इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हे पोर्टल सुरू केले आहे. 

या पोर्टलच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण  करण्यात आले. याद्वारे विविध कंपन्या व संस्था यांच्याकडे उपलब्ध असलेली इंटर्नशिपची नोंदणी विनामूल्य करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयांच्या नोडल ऑफिसरमार्फत विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. या माध्यमातून विद्यार्थांना त्यांच्या महाविद्यालयाजवळ, घराजवळ उपलब्ध असणाऱ्या सर्व इंटर्नशिपची माहिती मिळू शकणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सलग्न असलेल्या पुण्यासह, नाशिक, अहमदनगर जिल्हातील सर्व विद्यार्थांना कोणत्याही शुल्काशिवाय या पोर्टलवरील सेवांचा लाभ घेता येणार आहे. 

कुलगुरु गोसावी म्हणाले, इंटर्नशिप पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थांना वर्गात शिकवले जाणारे ज्ञान व्यवहारात आणि व्यवसायात कसे वापरायचे याची प्रत्यक्ष संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

प्र-कुलगुरु काळकर म्हणाले, इंटर्नशिप, ऑन जाॅब ट्रेनिंग, जाॅब शैडोइंग अशा सर्व नवीन संकल्यनांना मूर्त रुप देण्यासाठी विद्यापीठाने मोफत ऑनलाइन प्रणालाीची व्यवस्था केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये इंटर्नशिप देणाऱ्या सर्व कंपन्यांना/संस्थांना नोंदणी करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.