UPSC अंतर्गत  प्राध्यापकासह १०९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध; 'ही'  तारिख अंतिम 

UPSC अंतर्गत  प्राध्यापकासह १०९  पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध; 'ही'  तारिख अंतिम 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

तुम्ही केंद्र सरकारची नोकरी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण केंद्रीय लोकसेवा आयोगा (UPSC) अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत तब्बल 109 पदांसाठी (109 post) रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Apply online) करायचा आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 3 मेपर्यंत अर्ज भरावेत. ३ मे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्याअगोदर तुम्ही https://upsc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज पुर्ण करु शकता. या भरती प्रक्रियेत विविध एकूण १०९ पदे असून UPSC अंतर्गत ही प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी 

खालील पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार 

वैज्ञानिक-बी (नॉनडिस्ट्रक्टिव्ह), सहाय्यक प्राध्यापक (नेफ्रोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (न्यूक्लियर मेडिसिन), सहाय्यक प्राध्यापक (ऑर्थोपेडिक्स), सहाय्यक प्राध्यापक (बालरोग हृदयविज्ञान), सहाय्यक प्राध्यापक (बालरोग शस्त्रक्रिया), सहायक प्राध्यापक (प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया), सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक (सर्जिकल ऑन्कोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (युरोलॉजी), संशोधन अधिकारी (रसायनशास्त्र), वैज्ञानिक 'बी' (रसायनशास्त्र), वैज्ञानिक 'बी' (भौतिकशास्त्र), अन्वेषक ग्रेड-I, सहायक रसायनशास्त्रज्ञ, उपमहासंचालक (तांत्रिक), सहायक प्राध्यापक (बीबीए), सहायक प्राध्यापक (वाणिज्य सामान्य), सहायक प्राध्यापक (कॉर्पोरेट सचिवपद), सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र), सहायक प्राध्यापक (इंग्रजी), सहायक प्राध्यापक (हिंदी), सहायक प्राध्यापक (संगीत), सहायक प्राध्यापक (मानसशास्त्र), सहाय्यक प्राध्यापक (समाजशास्त्र), वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद) ही पदे भरली जाणार आहेत. 

अर्ज कसा करावा?

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी UPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. नोंदणी या करा. सर्व माहिती भरा. परीक्षा शुल्क भरा आणि प्रिंट काढून घ्या.