Pune Crime News : धक्कादायक घटना : क्लासमधील विद्यार्थीनीवर शिक्षकाकडून बलात्कार

पुण्यातील लोणी काळभोरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Pune Crime News : धक्कादायक घटना : क्लासमधील विद्यार्थीनीवर शिक्षकाकडून  बलात्कार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

Pune News : पुण्यातील लोणी काळभोरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्लास मधील शिक्षकानेच विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून या मुलीने चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क करत शिक्षकाचे  हे कृत्य समोर आणले आहे. 
 
वरिष्ठ पोलीस (Police) निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 वर्षे वयाच्या अल्पवयीन पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सातारा जिल्ह्यातील ही मुलगी हंडेवाडी (ता. हवेली) परीसरात आपल्या मैत्रिणीसह राहत आहे. समृध्दी हॉटेल जवळील एका क्लासमध्ये ती जुलै 2023 पासून जात होती.  

क्लासेस सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालू असतात. आरोपीने नोव्हेंबर महीन्यात दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारांस तिला घरी कपडे धुण्यासाठी बोलावले होते. कपडे धुत असतांना त्याने जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. मात्र या घटनेने घाबरून गेली असल्याने मुलीने घडलेल्या प्रकाराबात कुणाला सांगितले नाही. त्यानंतर आरोपीने पुन्हा घरी बोलावून परत दोन वेळा बलातकार केला.

हेही वाचा : पुस्तकातून झाला 'भारत' शब्दाचा विश्व विक्रम
 
13 डिसेंबर रोजी पिडीत मुलगी मुळ गांवावरून पुण्यात आल्यानंतर सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने घडलेला प्रकार चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 181 वर संपर्क सांगितला. त्यानंतर तिने सखी वन स्टॉप सेंटर 1 मुंढवा येथे जावून घडला प्रकार सांगितला.  त्यानंतर तेथील कर्मचारी यांचेसह लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी त्यानुसार आरोपीवर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करत आहेत.