युजीसीचा इशारा : परदेशी विद्यापीठे, जाहिरातदारांना ऑनलाइन अभ्यासक्रमची जाहिरात पडणार महागात 

ऑनलाइन अभ्यासक्रमची फसवी जाहिरात करणाऱ्या परदेशी विद्यापीठावर आणि जाहिरात देणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा युजीसीने दिला आहे.

युजीसीचा इशारा : परदेशी विद्यापीठे, जाहिरातदारांना ऑनलाइन अभ्यासक्रमची जाहिरात पडणार महागात 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नुकतेच परदेशी विद्यापीठांसाठी देशात कॅम्पस सुरू करण्यासाठी नियम प्रसिद्ध केले आहे.  त्यानंतर आता यूजीसीकडून एक नवीन अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाइन अभ्यासक्रमची फसवी जाहिरात (Fraudulent advertising of online courses) करणाऱ्या परदेशी विद्यापीठावर (Foreign universities)आणि जाहिरात देणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा युजीसीने दिला आहे.

"काही एडटेक कंपन्या काही परदेशी विद्यापीठे/  संस्थांच्या सहकार्याने वृत्तपत्रे / सोशल मीडिया / टेलिव्हिजन इत्यादींवर ऑनलाइन पद्धतीने पदवी आणि पदविका कार्यक्रम ऑफर करणाऱ्या जाहिराती करत असल्याचेही लक्षात आले आहे.  अशा फ्रँचायझी व्यवस्थेला परवानगी नाही. तसेच असा कोणताही कार्यक्रम/पदवी UGC द्वारे मान्यताप्राप्त होणार नाही. सर्व फसव्या एडटेक कंपन्यांवर तसेच त्यांच्या एचईएलवर नियमानुसार कारवाई केली जाईल." असे युजीसीने स्पष्ट केले आहे. त्याचाप्रमाणे  विद्यार्थी आणि जनतेला याबाबत जागरूक राहण्याचा सल्ला युजीसीने दिला आहे.

आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही परदेशी उच्च शैक्षणिक संस्था भारतात कोणताही अभ्यासक्रम देऊ शकणार नाही. हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट  कोणत्याही फ्रँचायझी व्यवस्थेअंतर्गत अभ्यासक देऊ शकता नाही.तसेच अशा अभ्यासक्रमांना UGC द्वारे मान्यता दिली जाणार नाही, असेही UGC ने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.