लग्नाला दोन वर्षे झाली.. नवऱ्याने पाठिंबा दिला.. अन् ती राज्यात प्रथम आली..

पूजा वंजारी हिने स्वत:ला सिध्द करून दाखवत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या गुणवत्ता यादीत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

लग्नाला दोन वर्षे झाली..  नवऱ्याने  पाठिंबा दिला.. अन् ती राज्यात प्रथम आली..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

लग्न झाले की वेळ मिळत नाही; संसाराचा गाडा ओढण्यात अनेक जण गुरफुटून जातात.पण लग्नाला दोन वर्षे झाल्यानंतरही पूजा वंजारी हिने जीद्द, कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर पूजा वंजारी (Pooja Vanjari) हिने स्वत:ला सिध्द करून दाखवत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या (State Services Main Exam 2022)गुणवत्ता यादीत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक (1st in State in Girls) पटकावला.नवऱ्याने दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी हे यश संपादन करू शकले,असे पूजाने 'एज्युवार्ता'शी बोलताना सांगितले.

राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नवी मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या केंद्रांवर ३० नोव्हेंबर,२०२३ ते १८ जानेवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या.मुलाखतीचा हा कार्यक्रम संपल्यानंतर एका तासाच्या अवधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली.त्यात पूजाने 570 गुण मिळवत  मुलींमध्ये पहिलं क्रमांक मिळवला.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण काहीसे कमीच आहे.कुटुंबिक जबाबदाऱ्या,वय वाढल्यानंतर लग्नासाठी वाढणारा दबाव,सामाजिक परिस्थिती या सर्वातून मुली अभ्यास करून यश संपादन करतात.पूजा वंजारी ही त्यातीलचा एक यशस्वी विद्यार्थीनी आहे.

हेही वाचा: वयाच्या 21व्या वर्षीच विनायकने गाजवलं एमपीएससीचं मैदान ; आधी उपशिक्षण अधिकारी , आता राज्यात प्रथम

मुळची सांगली जिलह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील पूजा एका शेतकरी शेतकरी कुटुंबातील आहे.आई-वडिलानी दाखवलेल्या विश्वासामुळे तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले.2020 मध्ये स्पर्धा परेएकेच्या माध्यमातून सहकार खातीत नोकरी मिळवली.मात्र,त्यावर तिने समाधान न मानता आपला अभ्यास सुरूच ठेवला.लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली तरीही तिने राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२२ मध्ये राज्यात प्रथम येण्याचा माण मिळवला.

 पूजा वंजारी सांगते की, आई-वडिलांनी शिकवून दिशा दाखवली.माझे पती  सिव्हिल इंजिनिअर आहेत.लग्नानंतरही त्यांनी मला पाठिंबा दिला.त्यामुळे मला हे यश संपादन करता आले.