विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा; एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच शुल्क

आमदार रोहित पवार यांनीही एकाच जाहिरातीतील विविध पदांसाठी एकदाच शुल्क आकारावे, अशी मागणी केली होती.

विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा; एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच शुल्क
Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सरकारच्या (Maharashtra Government) विविध विभागांकडून सध्या पदभरती प्रक्रिया (Recruitment) राबविली जात आहे. पण एकाच जाहिरातीतील विविध पदांसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याबाबत विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही (Maharashtra Assembly) चर्चा झाली होती. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांनी असे शुल्क आकारले जाऊ नये, अशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आमदार रोहित पवार यांनीही एकाच जाहिरातीतील विविध पदांसाठी एकदाच शुल्क आकारावे, अशी मागणी केली होती. अजित पवार यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांचे आभार मानले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी ट्विट करून अधिकाऱ्यांना दिलेल्या सुचनांबाबत माहिती दिली आहे.

रेल्वेत अडीच लाख पदे रिक्त; लवकरच सुरु होणार भरती, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

राज्य शासनाच्या काही विभागांनी काढलेल्या पदभरतीच्या जाहिरातीत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारल्याचे समोर आले आहे. ही बाब परीक्षार्थींवर अन्याय करणारी असून एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच शुल्क आकारण्यात यावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती अजित पवार यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

रोहित पवार यांनी या ट्विटनंतर अजित पवार यांचे आभार मानले. एकाच जाहिरातीतल्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे शुल्क न आकारता एकच शुल्क आकारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल आभार. सरळसेवा भरतीसाठी असलेले एक हजार रुपये शुल्क विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे UPSC प्रमाणे शंभर रुपये किंवा MPSC प्रमाणे किमान शुल्क आकारणे गरजेचे आहे. राजस्थान सरकार प्रमाणे one time registration system केल्यास विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.

परीक्षा पारदर्शक होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून परीक्षा पारदर्शकपणे पार पाडाव्यात यासाठी देखील आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, असेही रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo