UPSC मध्ये सहाय्यक संचालक आणि इतर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु 

सहाय्यक संचालक आणि इतर पदांसाठी भरती जाहीर झाली असून  अर्ज नोंदणी सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत साइट upsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

UPSC मध्ये सहाय्यक संचालक आणि इतर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी (Good news for youth) समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC)  बंपर भरती काढली आहे. सहाय्यक संचालक आणि इतर पदांसाठी भरती जाहीर (Recruitment announced) केली असून  अर्ज नोंदणी सुरु (Application registration) झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार अधिकृत साइट upsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
  
इच्छुक आणि पात्र उमेदवार  14 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 मार्च 2024 आहे. या भरती मोहिमेद्वारे 76 पदे भरण्यात येणार आहेत. या मोहिमेद्वारे सहाय्यक संचालकाची 36 पदे, विशेषज्ञ श्रेणी III ची 32 पदे, सहाय्यक खर्च लेखाधिकारी 7 पदे आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता 1 पदे भरण्यात येणार आहेत. 

उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 25 रुपये शुल्क भरावे लागतील. महिला/SC/ST/PWBD/PWD उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अर्ज फी भरण्यासाठी उमेदवार नेट बँकिंग/डेबिट कार्ड वापरू शकतात. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.

असा करा अर्ज ..

अर्ज करण्यासाठी, प्रथम upsc.gov.in या अधिकृत साइटवर जा. त्यानंतर मुख्यपृष्ठावरील संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.नंतर  नोंदणी करून अर्ज भरा.  आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. केंद्रीय लोकसेवा आयाोगाने ठवरून दिलेली फाॅर्म फी भरा. अर्ज सबमिट करा. अर्ज अपलोड करून त्याची प्रिंट आऊट घ्या.