ICSI-CS एक्झिक्युटिव्ह प्रोफेशनलचे हॉल तिकीट उपलब्ध 

परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार icsi.edu या अधिकृत वेबसाइटवरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

ICSI-CS एक्झिक्युटिव्ह प्रोफेशनलचे हॉल तिकीट उपलब्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने  (ICSI) डिसेंबर सत्रासाठी CS एक्झिक्युटिव्ह (जुना व नवीन कोर्स) आणि व्यावसायिक परीक्षेसाठी हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहेत. परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार icsi.edu या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे हॉल तिकीट (Hall Ticket) डाउनलोड करू शकतात.

हेही वाचा : Ajit Pawar statement of Ph.D : अजित पवार यांच्या व्यक्तव्याचे राज्यभर पडसाद ; संशोधक विद्यार्थी आक्रमक

आयसीएसआयने सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस प्रोफेशनलसाठी ICSI-CS डिसेंबर २०२३ ची परीक्षा येत्या २१ डिसेंबरपासून सुरू होईल. विद्यार्थी १७ अंकी नोंदणी क्रमांकासह लॉग इन करून अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे ICSI-CS २०२३ हॉल तिकीट डाउनलोड करू शकतील. तसेच ICSI हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर, उमेदवारांना नाव, फोटो, स्वाक्षरी, नोंदणी क्रमांक, परीक्षेचा टप्पा, परीक्षा केंद्र, परीक्षेचे माध्यम आणि मॉड्यूल, तारखा, परीक्षेची वेळ, पेपर तपशील यासारखे सर्व तपशील तपासावेत, असा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. 


हॉल तिकीट असे करा डाउनलोड 

* सर्वप्रथम icsi.edu या संस्थेच्या वेबसाइटवर जा.
* मुख्यपृष्ठावर सीएस एक्झिक्युटिव्ह, प्रोफेशनल डिसेंबर परीक्षेच्या हॉल तिकीटची  लिंक उघडा.
* आता तुमचा १७ अंकी नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर लॉगिन करा.
* तुमचे हॉल तिकीट तपासा आणि डाउनलोड करा.
* सूचना वाचा आणि तपशील तपासा

-----------------------------