CSEET परीक्षेत बदल ; परीक्षा आता ३० जुलैला होणार 

CSEET जुलै २०२३ परीक्षा आता  येत्या ३० जुलै २०२३ रोजी होणार आहे. काही अपरिहार्य कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

CSEET परीक्षेत बदल ; परीक्षा आता ३० जुलैला होणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) यांच्याकडून घेण्यात येणारी सीएस एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट (CSEET) परीक्षा पूर्वी ठरल्याप्रमाणे येत्या ८ जुलै रोजी होणार होती. पण आता या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, ICSI - CSEET २०२३ परीक्षा आता ३० जुलै रोजी होणार आहे. तसेच यापूर्वी अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे, असे उमेदवार आता १० जुलै पर्यंत अर्ज करू शकतात. 

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने त्यांच्या अधिसूचनेत म्हटले आहे की , “CSEET जुलै २०२३ परीक्षा आता  येत्या ३० जुलै २०२३ रोजी होणार आहे. काही अपरिहार्य कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.  रिमोट प्रोक्टोरिंग अंतर्गत ही चाचणी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. सर्व पात्र उमेदवारांना परीक्षेच्या तीन दिवस आधी लॉग-इन क्रेडेन्शियल पाठवले जातील."