‘नीटी’ बनणार ‘आयआयएम’ मुंबई; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) कायदा, २०१७ अंतर्गत NITIE मुंबईला IIM बनविण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तज्ञ समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

‘नीटी’ बनणार ‘आयआयएम’ मुंबई; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
NITIE Now IIM

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM)  विधेयक २०२३ ला संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर आता या विधेयकाचे प्रत्यक्ष परिणाम दिसू लागले आहेत. या विधेयकाला मान्यता मिळाल्यामुळे मुंबईतील राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (NITIE) आता  अधिकृतपणे भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच  IIM मुंबई होणार आहे. IIM मुंबई ही देशातील २१ वी IIM  संस्था असेल.  

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) कायदा, २०१७ अंतर्गत नीटी, मुंबईला IIM बनविण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तज्ञ समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तज्ञ समितीमध्ये पाच सदस्य असतील जे NITIE मुंबईला IIM अंतर्गत आणतील. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अलाहाबाद विद्यापीठाचे कुलपती आशिष कुमार चौहान या समितीचे अध्यक्ष असतील. तर IIT मुंबईचे संचालक  प्रा. सुभाषीष चौधरी, आयआयएम तिरुचिरापल्लीचे संचालक  प्रा.  पवन कुमार सिंग,  IIT बी.एच.यु. चे संचालक  प्रा.  प्रमोद कुमार जैन,  आणि मेसर्स प्रदीप मेटल्सचे प्रमुख  प्रदीप गोयल हे या तज्ञ समितीचे सदस्य असतील.

SPPU News : चुका माफ करून विद्यार्थ्यांच्या गुणांची दुरुस्ती करण्याची संधी द्यावी! प्राध्यापक संघटनेची मागणी

पाच सदस्यीय समिती IIM कायदा, २०१७ अंतर्गत समावेशासाठी NITIE मुंबईच्या तयारीचे मूल्यांकन करेल, त्यानंतर संस्थेच्या विद्यमान पायाभूत सुविधा किंवा शैक्षणिक आणि गैर-शैक्षणिक कर्मचार्‍यांच्या कामाचे मूल्यमापन करेल. विशेष म्हणजे औद्योगिक अभियांत्रिकी, अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि व्यवस्थापन विज्ञान क्षेत्रात तरुणांना शिक्षण देण्यात NITIE, मुंबई प्रथम क्रमांकावर आहे. 'द इम्पॅक्ट रँकिंग २०२१' ने NITIE ला जगभरात ६८ वे आणि भारतात तिसरे स्थान दिले आहे. तर 'इकॉनॉमिक टाइम्स २०२१' ने  संस्थेला एकूण २४ वे, HR मध्ये २२ वे आणि 'Outlook Eyecare 2021' ने  १७ वे स्थान मिळाले आहे.

'NIRF 2021' नुसार, NITIE भारतातील सर्वोत्कृष्ट बी-स्कूलच्या श्रेणीमध्ये १२ व्या क्रमांकावर आहे.  दरम्यान सध्या NITIE मध्ये सुमारे १२०० विद्यार्थी विविध अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना  पदवीनंतर IIM मुंबईचे प्रमाणपत्र मिळेल, अशी माहिती NITIE चे  सोसायटी आणि बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांनी दिली.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo