सीए फाउंडेशन, इंटर आणि फाइनल परीक्षेसाठी आजपासून नोंदणी सुरु 

शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारीपासून  अधिकृत वेबसाईट icai.org वर जाऊन भरता येणार फाॅर्म

सीए फाउंडेशन, इंटर आणि फाइनल परीक्षेसाठी आजपासून नोंदणी सुरु 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सीए फाउंडेशन, (Registration for CA Foundation) इंटर आणि फायनल विद्यार्थ्यांना मे सत्र परीक्षांचे नोंदणी अर्ज (May Session Exam Registration Application) शुक्रवारपासून ( दिनांक २) अधिकृत वेबसाईट icai.org वर जाऊन भरता येणार आहेत. इन्सिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) द्वारे मे २०२४ च्या सत्रासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सीए परीक्षांसाठी (CA Exams) नोंदणी प्रक्रिया (Registration process) सुध्दा सुरू झाली आहे.अर्ज करण्यास येत्या २३ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत (deadline) देण्यात आली आहे. 

दरम्यान, उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर (Government official website) जाऊन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर फाॅर्म जमा करण्यासाठी ३ ते ९ मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. ३ ते ९ या तारखेमध्ये परिक्षार्थिंना परिक्षेचे शहर, परीक्षेचे माध्यम निवडण्याचा व बदलण्यचा पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देवून काही बदल नोंदवण्यात आले आहे का ? हे पाहाणे गरजेचे ठरणार आहे. 

सीए मे-जून फाउंडेशन कोर्सच्या परीक्षा २०, २२, २४ आणि २६ जून २०२४ रोजी घेतल्या जाणार आहेत. सीए गट १ साठी इंटरमिजिएट अभ्यासक्रमाची परीक्षा ३,५ आणि ७ मे २०२४ रोजी घेतली जाईल. तर गट २ च्या परीक्षा ९, ११ आणि १३ मे २०२४ रोजी घेण्यात येतील. या व्यतिरिक्त सीए अंतिम गट १ च्या अंतिम परीक्षा २, ४ आणि ६ मे २०२४ रोरजी आणि गट २ च्या परीक्षा ८, १० आणि १२ मे २०२४ रोजी आयोजित केल्या जातील.