पाचवी ,आठवी स्कॉलरशीप परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली

पाचवी ,आठवी  स्कॉलरशीप परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी इयत्ता पाचवी व आठवी (Fifth and eighth) शिष्यवृत्ती परीक्षा  (Scholarship Examination) येत्या १८ फेब्रुवारी रोजी राज्यातीलअ विविध परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट शुक्रवार (दि.2 ) फेब्रुवारीपासून शाळेच्या लाॅगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सर्व विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या मुख्यध्यापकांकडून हॉल तिकीट  प्राप्त करुन घ्यावे ,असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.  

गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 9  हजाराने कमी आहे.  2023 मध्ये पंचवीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 5  लाख 32  हजार 876  एवढी होती तर, आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या 3  लाख 67  हजार 802  एवढी होती. 2023 मध्ये एकूण  9  लाख 678 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर 2024  मध्ये  पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी  प्रविष्ठ  झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 5  लाख 10  हजार 218  एवढी असून आठवीची विद्यार्थी संख्या 3  लाख 81  हजार 162 आहे. यंदा एकुण विद्यार्थी संख्या ही 8 लाख 91  हजार 380 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.