यूजीसी-नेट प्रश्नपत्रिका डार्कनेटवर झाली होती लीक; शिक्षण मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा 

नेट परीक्षेची प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक झाल्याचे उघड झाल्यानंतर यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्यात आली.

यूजीसी-नेट प्रश्नपत्रिका डार्कनेटवर झाली होती लीक; शिक्षण मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

यूजीसी-नेट परीक्षा रद्द (UGC-NET exam canceled) झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. यातच यूजीसी-नेट प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक झाली (question paper was leaked on darknet) होती,असा धक्काडायक खुलासा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan)यांनी केला आहे. 

 केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले , "परीक्षेची प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक झाल्याचे उघड झाल्यानंतर यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्यात आली. फुटलेली प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळल्याची खात्री झाल्यानंतर 18 जून रोजी घेलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. डार्कनेट, किंवा डार्क वेब, सर्च इंजिनच्या आवाक्याबाहेरचा इंटरनेटचा एक छुपा भाग आहे, जेथे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात निनावी असतात आणि व्यवहार अनेकदा बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी वापरून केले जातात." 


NEET-UG परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने  विशेषतः बिहारमध्ये राजकीय वादाला तोंड फुटले. या प्रश्नाला उत्तर देताना प्रधान म्हणाले की, "दोषी आढळलेल्यांवर कोणाचेही गय केली जाणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.  "तुरळक घटनांमुळे" चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार तडजोड करणार नाही.

शिक्षण मंत्री म्हणाले, "आम्ही NEET परीक्षेसंदर्भात बिहार सरकारच्या संपर्कात आहोत. आम्हाला या प्रकरणाशी संबंधित माहिती आणि तपशील मिळाले आहेत. सविस्तर अहवालाची प्रतीक्षा आहे." NTA आणि त्याच्या कार्यांचे मूल्यांकन करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या शिफारशींवर सखोल चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.