विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! UPSC कडून २४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

नागरी सेवा परीक्षेसह वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, एनडीए, वैद्यकीय सेवा, सीडीएस, जिओ सायन्टिस्ट, सीआयएसफ आदी परीक्षांचा वेळापत्रकामध्ये समावेश आहे.

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! UPSC कडून २४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
UPSC Calendor 2024

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या विविध २४ परीक्षांचे वेळापत्रक (Timetable) जाहीर केले आहे. बहुतेक विद्यार्थी तयारी करत असलेली नागरी सेवा पूर्व परीक्षा (Civil services Examination) २६ मे रोजी नियोजित आहे. तर मुख्य परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे (Students) आता तयारीसाठी वर्षाचा कालावधी आहे. (UPSC Releases Examination Calendar For 2024)

आयोगाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकामध्ये परीक्षेच्या तारखांसह जाहिरात कधी निघणार, अर्ज करण्याची अंतिम मुदत ही माहिती दिली आहे. नागरी सेवा परीक्षेसह वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, एनडीए, वैद्यकीय सेवा, सीडीएस, जिओ सायन्टिस्ट, सीआयएसफ आदी परीक्षांचा समावेश आहे. परीक्षांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हे वेळापत्रक UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

हेही वाचा : MPSC Exam : टंकलेखन कौशल्य चाचणी पुन्हा होणार; आयोगाचा मोठा निर्णय

दरम्यान, परिस्थितीनुसार परीक्षेचा तारखा, अधिसुचना किंवा परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदतीच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

UPSC परीक्षांचे वेळापत्रक (वर्ष २०२४) -

  1. UPSC RT/परीक्षेसाठी राखीव - १३ जानेवारी (शनिवार)
  2. अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा – १८ फेब्रुवारी (रविवार)
  3. संयुक्त भू-शास्त्रज्ञ (पूर्व) परीक्षा – १८ फेब्रुवारी (रविवार)
  4. UPSC RT/परीक्षेसाठी राखीव - २४ फेब्रुवारी (शनिवार)
  5. CISF AC(EXE) LDCE-2024 -१० मार्च (रविवार)
  6. UPSC RT/परीक्षेसाठी राखीव – ९ मार्च (शनिवार)
  7. N.D.A. & N.A. परीक्षा (१) – २१ एप्रिल (रविवार)
  8. C.D.S. परीक्षा (१) – २१ एप्रिल (रविवार)
  9. नागरी सेवा (पूर्व) परीक्षा – २६ मे (रविवार)
  10. भारतीय वन सेवा (पूर्व) – २६ मे (रविवार)
  11. I.E.S/I.S.S परीक्षा – २१ जून (शुक्रवार)
  12. संयुक्त भू-शास्त्रज्ञ (मुख्य) परीक्षा – २२ जून (शनिवार)
  13. अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा – २३ जून (रविवार)
  14. UPSC RT/ परीक्षेसाठी राखीव – ६ जूलै (शनिवार)
  15. संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा – १४ जुलै (रविवार)
  16. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (ACS) परीक्षा – ४ ऑगस्ट (रविवार)
  17. UPSC RT/ परीक्षेसाठी राखीव – १० ऑगस्ट (शनिवार)
  18. N.D.A. & N.A. परीक्षा (२) – १ सप्टेंबर (रविवार)
  19. C.D.S. परीक्षा (२) – १ सप्टेंबर (रविवार)
  20. नागरी सेवा (मुख्य) परीक्षा – २० सप्टेंबर (शुक्रवार)
  21. UPSC RT/परीक्षेसाठी राखीव – १९ ऑक्टोबर (शनिवार)
  22. भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा – २४ नोव्हेंबर (रविवार)
  23. S.O/Steno (GD-B/GD-1) LDCE – ७ डिसेंबर (शनिवार)
  24. UPSC RT/परीक्षेसाठी राखीव – २१ डिसेंबर (शनिवार)