व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या 'त्या'विद्यार्थ्यांवर होणार गुन्हे दाखल; डीटीईचा स्पष्ट इशारा; त्यामुळे ही कागदपत्र काढूनच ठेवा

सक्षम प्राधिकारणांकडून प्रमाणपत्र प्राप्त न करून घेता बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या 'त्या'विद्यार्थ्यांवर होणार गुन्हे दाखल; डीटीईचा स्पष्ट इशारा; त्यामुळे ही कागदपत्र काढूनच ठेवा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test Cell)विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या (professional courses)परीक्षा घेतली जात असून काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेऊन निकाल जाहीर केले जात आहेत.मात्र,तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्वपूर्ण कागदपत्र सादर करणे बंधनकारक (Submission of important documents is mandatory for admission)आहे.त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश (admission to professional courses)घेऊ इच्छिणाऱ्या  सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र काढून ठेवावीत,अशा स्पष्ट सूचना राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर ( Director of Technical Education Dr. Vinod Mohitkar)यांनी दिल्या आहेत.तसेच सक्षम प्राधिकारणांकडून प्रमाणपत्र प्राप्त न करून घेता बनावट प्रमाणपत्र (fake certificate)सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे (Criminal offences)दाखल केले जाणार आहेत,असा इशाराही मोहितकर यांनी दिला आहे. 

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले असून त्यानुसार तंत्रशिक्षण  विभागातर्फे  प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पोस्ट एस.एस.सी. अभियांत्रिकी/ तंत्रशास्त्र, प्रथम वर्ष वास्तुकला, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी, सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रम (Diploma) तसेच प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी / तंत्रशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरींग टेक्नॉलॉजी पदवी, प्रथम वर्ष फार्म.डी., वास्तुशास्त्र, बी. प्लॅनिंग, बी. डिझाइन, बीबीए / बीएमएस / बीबीएम, बीसीए हे पदवी अभ्यासक्रम (Under Graduate) आणि प्रथम वर्ष एम.ई./एम.टेक., एम. फार्म., फार्म.डी. (PostBaccalaureate), एम. आर्किटेक्चर, एम. प्लॅनिंग, एम.एचएमसीटी, एमबीए/एमएमएस, एमसीए हे पदव्युत्तर पदवी (Post Graduate) त्याचप्रमाणे प्रथम वर्ष एम.ई./एम.टेक., एम. प्लॅनिंग एम.एचएमसीटी, एमबीए/एमएमएस, एमसीए हे एकात्मिक पदवी अभ्यासक्रम (Integrated) व ज्या अभ्यासक्रमांत थेट व्दितीय वर्षात प्रवेश दिला जातो,अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी खालील कागदपत्र आवश्यक आहे.

* जात / जमात प्रमाणपत्र (Caste / Tribe Certificate) (महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले)
* जात / जमात वैधता प्रमाणपत्र (Caste / Tribe Validity Certificate) (महाराष्ट्रातील सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले).

* इ.१० वी व १२ वी नंतरच्या पदविका प्रवेशासाठी जात/जमात वैधता प्रमाणपत्र आवश्यक नाही. मात्र प्रथम वर्ष पदविका किंवा द्वितीय वर्षातील पदविका अभ्यासक्रमाच्या राखीव जागेवर प्रवेश मिळालेल्या मागासवर्गीय उमेदवाराने प्रवेश मिळाल्यापासून १ महिन्याच्या आत जात/जमात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी संबंधित जात / जमात पडताळणी समितीकडे योग्य भरलेला अर्ज सादर करावा लागेल.
* पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या मागासवर्गीयांसाठीच्या राखीव जागेवर प्रवेशासाठी मागासवर्गीय उमेदवाराने जात/जमात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
* अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उर्वरीत सर्व मागासवर्गीय उमेदवारांसाठी दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र (Non- Creamy Layer Certificate), राज्याबाहेरील मागासवर्गीय उमेदवारांचा अधिवास महाराष्ट्र राज्यात असला तरी महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या आरक्षणाचे धोरण त्यांना लागू नाही.
*  राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate) व अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्या प्रकरणी आवश्यकतेनुसार.
* उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate) TFWS योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले.
* आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी (EWS) प्रमाणपत्र : महाराष्ट्र राज्याच्या शासन निर्णयास अनुसरून विहीत केलेल्या प्रपत्रात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता वैध असलेले, सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.
* दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र (Person with Disability) - आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकारी यांनी विहीत प्रपत्रात निर्गमित केलेले.
* सैन्य दलातील (Defence) संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या प्रवेशासाठी माहिती पुस्तिकेत दिलेले सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र.
* आधार क्रमांक व संलग्नित बँक खाते शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती इ. योजनांची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक.
* वर्किंग प्रोफेशनल्सकरीता अनुभव प्रमाणपत्र व ना-हरकत प्रमाणपत्र
* Working Professionals योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोंदणीकृत उद्योग / आस्थापना (केंद्र / राज्य) / खाजगी / सार्वजनिक मर्यादित कंपनी / एमएसएमई अशा ठिकाणी नियमितपणे १ वर्ष काम
करीत असल्याबाबतचे अनुभव प्रमाणपत्र.