NEET UG 2023 : अखेर प्रवेशपत्र झाले उपलब्ध; इथून करा डाउनलोड

या वर्षी तब्बल २१ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. NEET ची परीक्षा रविवारी ७ मे रोजी दुपारी २ ते संध्याकाळी ५.२० या वेळेत होणार आहे.

NEET UG 2023 : अखेर प्रवेशपत्र झाले उपलब्ध; इथून करा डाउनलोड
NEET UG 2023 Admit card

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

येत्या रविवारी ७ मे रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेचे (NEET UG 2023) प्रवेशपत्र  नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) त्यांच्या अधिकृत वेबसाइट जारी केले आहे. या व्यतिरिक्त  NEET UG प्रवेशपत्र UMANG आणि DigiLocker या अतिरिक्त प्लॅटफॉर्मवरून देखील डाउनलोड करता येऊ शकते.

NTA  ने विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात अडचण आल्यास neet@nta.ac.in वर सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत  ईमेल पाठवा, असे NTA च्या वतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : मागासवर्गीय शिष्यवृत्तीबाबत मोठी अपडेट; सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा

या वर्षी तब्बल २१ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. NEET ची परीक्षा रविवारी ७ मे रोजी दुपारी २ ते संध्याकाळी ५.२० या वेळेत होणार आहे. ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू अशा १३ भाषांमधून होणार आहे.

परीक्षा ऑफलाइन (पेन आणि पेपर-आधारित) होणार आहे. परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान या विषयांवरील १८० बहूपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. हे प्रश्न ११ वी आणि १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असतील.

प्रवेशपत्रासाठी अधिकृत संकेतस्थळ : neet.nta.nic.in