कृष्णकुमार गोयल यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार

आमचे टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय आम्ही आता हायटेक केलेले आहे. काळानुरूप आपण वागले पाहिजे,असे कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले

कृष्णकुमार गोयल यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अत्यंत मानाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार  प्रसिद्ध उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्व कृष्णकुमार गोयल यांना आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा आणि मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
 कार्यक्रमात श्री श्री रविशंकर यांनी संवादातून सामंजस्य प्रस्थापित होते. छोट्या छोट्या गोष्टींमुळे माणसांमध्ये तणाव निर्माण होत असून या संघर्षाला संवाद महत्त्वाचा आहे आणि संवादातूनच सहयोग परावर्तित होऊ शकतो शिक्षणाचा मूळ हेतू संघर्षाला सहयोगात परावर्तित करावे असे प्रतिपादन केले  

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, प्राचार्य ठकाजी कानवडे, नाशिकचे श्री धात्रक, श्री मेहेर, श्री काकडे, श्री मिलिंद कांबळे यांचा यावेळी गौरव करण्यात आला
श्रीकृष्ण कुमार गोयल यांनी सन्मानास उत्तर देताना असे सांगितले की,  हा सन्मान माझे आई-वडील सहकारी व तळागाळातल्या लोकांबरोबर मी काम करतो त्या लोकांना समर्पित करीत आहे. माणसातील कोहिनूर हे माझे चरित्र नुकतेच प्रकाशित झाले असून यामध्ये माझ्या असीम कष्टाची कहाणी मी प्रतिपादित केलेली आहे.  खडकी शिक्षण संस्था व कोहिनूर ग्रुप इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य मी करत असतो.  कुठलीही कार्य मनाला पटले तरच करावे. आजही 70 व्या वर्षी मी किमान 12 ते 14 तास काम करतो. मला गुणवत्तेची ओढ असून प्रत्येक गोष्ट ही चांगली व्हावी गुणवत्तापूर्वक व्हावी, असा माझा प्रांजळ हेतू असतो. आमचे टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय आम्ही आता हायटेक केलेले आहे. काळानुरूप आपण वागले पाहिजे,याची मला जाण आहे,असे त्यांनी सांगितले

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी ,प्र कुलगुरू डॉ पराग काळकर ,प्रभारी कुलसचिव डॉ विजय खरे ,व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.  कुलगुरूंनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 75 वर्षाच्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षाचा आढावा घेतला.  आभार  पराग काळकर यांनी तर सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले.