आरटीई प्रवेश अर्जाचा मुहूर्त अखेर सापडला; विद्यार्थी नोंदणीला या तारखेपासून सुरूवात 

यंदा राज्यातील एकूण 75 हजार 972 शाळांनी  नोंदणी केली असून या वर्षी आरटीई प्रवेशासाठी 9 लाख 72 हजार 789 जागा उपलब्ध झाल्या आहेत.

आरटीई प्रवेश अर्जाचा मुहूर्त अखेर सापडला; विद्यार्थी नोंदणीला या तारखेपासून सुरूवात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (Right to Education Act- RTEआरटीई) राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश देण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसात सुरू केली जाणार असल्याचे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी (Director of Primary Education Sharad Gosavi)यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना सांगितले.त्यामुळे आरटीई (RTE)प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो पालकांना लवकरच आपल्या पाल्याच्या प्रवेशाचा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध होणार आहे.परंतु, बुधवारी रामनवमी निमित्त सुट्टी (Wednesday is a holiday on the occasion of Ram Navami)असल्याने बहुप्रतिक्षित आरटीई प्रवेश प्रक्रियेला मंगळवार किंवा गुरूवारचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.

अपडेट बातमी : आरटीई प्रवेशाचा अर्ज उद्यापासून भरता येणार

आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणीसाठी दिलेल्या मुदतीत अनेक शाळांनी नोंदणी केली नाही.त्यामुळे सुमारे एक आठवडा आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबली.यंदा राज्यातील एकूण 75 हजार 972 शाळांनी  नोंदणी केली असून या वर्षी आरटीई प्रवेशासाठी 9 लाख 72 हजार 789 जागा उपलब्ध झाल्या आहेत.मात्र, शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे.त्यामुळे पालक वर्गात प्रचंड नाराजी आहे.पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी 5 हजार 248 शाळा पात्र आहेत.त्यातील काही शाळांनी नोंदणी केली नव्हती.मात्र, शिक्षण विभागाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.पालक https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

शिक्षण आरटीई प्रवेशाचा गोंधळ : चौथी,सातवीनंतर बदलावी लागणार शाळा,नियमही मोडले जाणार?

आरटीई कायद्यात झालेल्या बदलानुसार विद्यार्थ्यांना प्रथमतः अनुदानित, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता.मात्र,आता इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्याय शेवटी ठेवला आहे. आता विद्यार्थ्यांना प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा व त्यानंतर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाईल. एखाद्या पालकाला प्राधान्यक्रम म्हणून अनुदानित शाळा ऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची किंवा शासकीय शाळेची निवड करावयाची असल्यास पालकाच्या प्राधान्य क्रमानुसार संबंधित शाळा निवडता येईल. विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा ,शासकीय शाळा ,स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल आणि एक किलोमीटरच्या अंतरावर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीतच त्या स्वंयअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाईल,असे शिक्षण विभागातर्फे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.
-------------------------------------------------

शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्याची आवश्यक तयारी केली आहे.एनआयसीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रियेची सर्व कामे पूर्ण झाली आहेत.त्यामुळे दोन दिवसात आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाईल. 
- शरद गोसावी, संचालक , प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य