आरटीई प्रवेशाचा अर्ज उद्यापासून भरता येणार 

आरटीई प्रवेशाचा अर्ज उद्यापासून भरता येणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश देण्याची प्रक्रिया १६ एप्रिल पासून सुरू केली जाणार असल्याचे परिपत्रक राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी( Sharad gosavi)यांनी सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध केले. त्यामुळे आरटीई प्रवेशाच्या (RTE admission)प्रतिक्षेत असलेल्या पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशाचा अर्ज येत्या 16 ते 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून शाळा नोंदणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आता विद्यार्थी नोंदणीचा दुसरा टप्पा सुरू केला जात आहे.पालक आपल्या पाल्याचा आरटीई प्रवेश प्रक्रियेचा अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सायंकाळी सहा वाजता एज्युवार्ताशी बोलताना मंगळवारी किंवा गुरुवारी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू केले जाईल, असे सांगितले होते.मात्र, आरटीई प्रवेशाची सर्व तयारी पूर्ण झाल्यामुळे सायंकाळी सात वाजता आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू केली जात असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले. पालक https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरू शकतात.