आरटीई प्रवेशाचा गोंधळ : चौथी,सातवीनंतर बदलावी लागणार शाळा,नियमही मोडले जाणार?

आरटीईनुसार विद्यार्थ्याला त्यांच्या घरजवळील 1 ते 3 किलोमीटर अंतरावरील शाळेत शिक्षण देणे आवश्यक आहे.परंतु, सध्या केवळ चौथी ते सातवीपर्यंतच्या शिक्षणाची तजवीज केली जात आहे.

आरटीई प्रवेशाचा गोंधळ : चौथी,सातवीनंतर बदलावी लागणार शाळा,नियमही मोडले जाणार?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

( राहुल शिंदे )

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (Department of School Education)बदललेल्या नियमावलीप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार (Right to Education Act)( RTEआरटीई) 25 टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (RTE Online admission process)सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी घरांपासून एक किमी अंतरावरील शाळांची यादी अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहे.मात्र, अपवाद वगळता मुलांना अर्ज भरण्यासाठी  इयत्ता चौथी व सातवीपर्यंतच्या शाळा (Schools upto class 5th and 7th)उपलब्ध होत आहेत.परिणामी या शाळांमध्ये आरटीईतून प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांवर पुढे शाळा बदलण्याची वेळा (Timings of changing schools)येणार आहे.त्यावेळी शिक्षण विभागाला स्वत:च्या नियमांची मोडतोड करावी लागणार असल्याचे सध्य स्थितीवरून दिसून येत आहे.

हेही वाचा : RTE चा अर्ज भरला का ? आतापर्यंत साडेपाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी भरले अर्ज ; केवळ पुण्यातून प्रतिसाद

शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवताना काही नियम केले आहेत.एखाद्या विद्यार्थ्याने आरटीईतून प्रवेश घेतल्यानंतर त्याला इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत त्याच शाळेत शिक्षण पूर्ण करावे लागले.कोणत्याही परिस्थितीत आरटीईच्या विद्यार्थ्याला शाळा बदलून दिली जात नाही,असा शिक्षण विभागाकडे यापूर्वी शाळा बादलांसाठी अर्ज केलेल्या पालकांचा अनुभव आहे.त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश देताना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असणारी शाळा असणे आवश्यक आहे.मात्र,सध्या आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध करून दिल्या जात असलेल्या अनुदानित, सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या इयत्ता चौथी किंवा सातवीपर्यंतच आहेत.त्यामुळे पालक संघटनांकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत आक्षेप घेतला जात आहे.

आरटीईनुसार विद्यार्थ्याला त्यांच्या घरजवळील 1 ते 3 किलोमीटर अंतरावरील शाळेत शिक्षण देणे आवश्यक आहे.परंतु, सध्या केवळ चौथी ते सातवीपर्यंतच्या शिक्षणाची तजवीज केली जात आहे.सध्या अनेक विद्यार्थ्याला आठवीपर्यंत वर्ग असणारी शाळा उपलब्ध होत नाही.जर संबंधित विद्यार्थ्याला सध्या आपल्या घराजवळ आठवीपर्यंतचे वर्ग उपलब्ध नसतील तर चौथी किंवा सातवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यावर आठवीच्या वर्गाचे  शिक्षण घेण्यासाठी 1 ते 3 किलोमीटर अंतर ओलांडून जाण्याची वेळा येऊ शकते.त्यावेळी शासन नियमांची मोडतोड करणार आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

सध्या शिक्षण विभागाकडून राबवल्या जात असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 8 लाख 86 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.एवढ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाचवीपासूनच्या आणि आठवीच्या वर्गाच्या शिक्षणाचा प्रश्न या कारणांमुळे निर्माण होऊ शकतो.त्यामुळे सध्या राबविल्या जात असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञाकडून  व्यक्त केली जात आहे.
---------------------------------------------
शिक्षण हक्क कायद्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षणाचा विचार केला आहे.मात्र,सध्या प्रवेशासाठी उपलब्ध करून दिलेल्या शाळा या चौथी व सातवीपर्यंतच्या आहे.शिक्षण विभागाने कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या घाराजवळ आठवीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था करून देणे बंधनकारक आहे .पालकांवर चौथी आणि सातवीनंतर शाळा बदलण्याची वेळा आणू नये.तसेच हा प्रश्न एक दोन विद्यार्थ्यांचा नाही तर राज्यातील 8 लाख 86 हजार विद्यार्थ्यांचा आहे.त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार करावा. 
- मुकुंद किर्दत,आप  पालक युनियन