राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा  २०२४ चे मोफत मार्गदर्शन ; अर्हम फाऊंडेशन , वास्तव कट्टाचा पुढाकार

अर्हम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश पगारिया आणि वास्तव कट्टाचे महेश बडे व किरण निंभोरे , डॉ. आतिश चोरडिया, स्वराज पगारिया आणि अंकुश धवणे यांनी या व्याखानमालाचे आयोजन केले आहे.

राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा  २०२४ चे मोफत मार्गदर्शन ; अर्हम फाऊंडेशन , वास्तव कट्टाचा पुढाकार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे: राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा २०२४  (Joint Prelims Exam 2024)परीक्षेला अगदी एक-दीड महिनाच उरला असून या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अर्हम फाऊंडेशन (arham foundation) व वास्तव कट्टा (vastav katta) यांच्या वतीने आयोजित संवाद व्याख्यानमालचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या 19 मार्च ते 22 मार्च या कालावधीत नवी पेठ येथील पत्रकार भवन जवळील एम.एम.जोशी सभागृहात दररोज सायंकाळी 5.30 वाजता विद्यार्थ्यांना व्याख्यानमालेच्या माध्यमातून तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

अर्हम फाऊंडेशन व वास्तव कट्टा आयोजित "संवाद व्याख्यानमाला एमपीएससी च्या यशाचा मार्ग" या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा  २०२४  परीक्षेची रणनीती कशी असावी, याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहत.अर्हम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश पगारिया आणि वास्तव कट्टाचे महेश बडे व किरण निंभोरे , डॉ. आतिश चोरडिया, स्वराज पगारिया आणि अंकुश धवणे यांनी या व्याखानमालाचे आयोजन केले आहे.एज्युवार्ता या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहे. 

येत्या 19 मार्च रोजी स्टेपअप अॅकॅडमीचे संचालक दिलीप खाटेकर व लेखक किरण देसले व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत.तर व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी येत्या 20 मार्च रोजी स्पॉटलाईट अॅकॅडमीचे संचालक सुशील बारी  व लोकसेवा अॅकॅडमीचे संचालक आप्पा हातनुरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.तसेच तिसऱ्या दिवशी म्हणजेच येत्या 21 मार्च रोजी सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अॅकॅडमीचे संचालक सचिन ढवळे आणि शारदा अॅकॅडमीचे संचालक सचिन भस्के विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.तर शेवटच्या दिवशी येत्या 22 मार्चला लोकायन आयएएस अॅकॅडमीचे संचालक भूषण देशमुख आणि ज्ञानदीप अॅकॅडमीचे संचालक महेश शिंदे परीक्षेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

------------------------