प्राध्यापक भरतीनंतरच विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन

नॅक मूल्यांकनात उपलब्ध मनुष्यबळाला गुण आहेत.त्यामुळे रिक्त पदे भरल्याशिवाय विद्यापीठ नॅक मूल्यांकनाला सामोरे जाणार नाही.येत्या ८ ते १५ दिवसांत पदभरतीची जाहिरात प्रसिध्द होण्याची शक्यता आहे.

प्राध्यापक भरतीनंतरच विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

एनआयआरएफ , क्यूएस रॅकिंगमध्ये (NIRF, QS Ranking) घसरलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर (Savitribai Phule Pune University) नॅक मूल्यांकन (NAAC assessment) टिकवण्याचे व वाढवण्याचे मोठे आव्हान आहे. कमी झालले मनुष्यबळ (lack of manpower) आणि संशोधनात झालली घसरण ही विद्यापीठांसाठी डोके दुखी ठरत आहे. त्यामुळे विद्यापीठातील विविध विभागातील रिक्त पदांची भरती (vacant post recruitment) केल्याशिवाय नॅक मूल्यांकनाला सामोरे जायचे नाही,असा विचार वारिष्ठ स्तरावरील अधिकारी करत आहेत. परिणामी विद्यापीठाची रखडलेली १११ पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लवकरच नॅक पुनर्मुल्यांकनाला सामोरे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने विविध पातळ्यांवर कामाला सुरूवात केली आहे. अॅकॅडमिक ऑडिट , फायर ऑडिट आदी कामे झाली असून त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच विद्यापीठाकडून प्रथमत: आयआयक्यूए (Institutional Information for Quality Assessment- IIQA) तयार केला जात आहे. त्यासाठी सर्व विभांगांकडून माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे.तर माहिती देण्यास विलंब करणाऱ्या काही विभांगांशी प्रत्यक्ष संवाद साधून आवश्यक माहिती मागवली जात आहे. अॅकॅडमिक ऑडिटमध्ये स व बी ग्रेड मिळालेल्या विभागांचे साक्षमीकारण केले जात आहे. मात्र,अनेक विभागात पुरेसे मनुष्यबळ नाही.त्यामुळे विद्यापीठाने रिक्त पदांच्या भरतीला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. दरम्यानच्या काळात नॅकसाठी सेल्फ स्टडी रिपोर्ट तयार करून ठेवला जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वगळता राज्यातील इतर विद्यापीठातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया जवळवळ पूर्ण झाली आहे. सध्या पुणे विद्यापीठात सुमारे ५० टक्के विभाग प्रमुख पदाचा भार हा अतिरिक्त स्वरूपात दिला आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सुद्धा कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापकांची भरती केली आहे.नॅक मूल्यांकनात उपलब्ध मनुष्यबळाला गुण आहेत. त्यामुळे रिक्त पदे भरल्याशिवाय विद्यापीठ नॅक मूल्यांकनाला सामोरे जाणार नाही. येत्या ८ ते १५ दिवसांत पदभरतीची जाहिरात प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी- मार्च किंवा जुलै-ऑगस्ट या कालावधीत विद्यापीठ नॅक मूल्यांकनाला सामोरे जाईल,असा अंदाज विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
----------------------------