पहिल्या रँकच्या सृष्टीला जिंकायचेय सिंगल्समध्ये ग्रँडस्लॅम  ; राफेल नदाल रोल मॉडेल

एकाही भारतीयाने आतापर्यंत सिंगल्समध्ये ग्रँडस्लॅम जिंकलेले नाही, मला ते जिंकायचे आहे. सृष्टी १२ वयोगटातील मुलींच्या गटातील राज्यात पहिल्या रँकच्या तर देश पातळीवर ९ व्या क्रमांकाची खेळाडू आहे.

पहिल्या रँकच्या  सृष्टीला जिंकायचेय सिंगल्समध्ये ग्रँडस्लॅम  ; राफेल नदाल रोल मॉडेल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

"टेनिस (tennis) हेच माझं भविष्य आहे, एकाही भारतीयाने आतापर्यंत सिंगल्समध्ये ग्रँडस्लॅम (singles grandslam) जिंकलेले नाही, मला ते जिंकायचे आहे" , हे स्वप्न आहे, ११ वर्षीय टेनिस  खेळाडू सृष्टी सूर्यवंशी (tennis player Srishti Suryavanshi) हिचे. श्रुती ही सध्या पीएमश्री केंद्रीय विद्यालय, क्र. २, एएफ पुणे, (Kendriya Vidyalaya, no. 2, AF Pune) या शाळेत इयत्ता ६ वी मध्ये शिकत आहे. सृष्टी १२ वयोगटातील मुलींच्या गटातील राज्यात पहिल्या रँकच्या (first rank in the state) तर देश पातळीवर ९ व्या क्रमांकाची खेळाडू आहे. सृष्टीचे आई - वडील माधुरी आणि प्रकाश सूर्यवंशी  दोघेही GST मध्ये उपायुक्त  आहेत.

'एज्युवार्ता' शी बोलताना सृष्टी म्हणाली, " मी लहापानापासून माझी ताई शौर्या  हिला टेनिस खेळताना पाहत होते, तिच्यामुळे मलाही या खेळात रस वाटू लागला. आई -बाबांना  हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मलाही हा खेळ खेळण्यास प्रेरित केले. बाबा आणि ताई दोघेही सरावात माझी मदत करतात. पण टेनिसमुळे माझं अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही, याकडे आईचे व्यवस्थित लक्ष असते. मी रोज पहाटे ४.३० वाजता उठते. सकाळी टेनिसची प्रॅक्टिस झाल्यानंतर सकाळी शाळेत जाते. दुपारी अडीचच्या दरम्यान घरी येते, त्यानंतर जेवण करून नियमितपणे तास भर अभ्यास आणि त्यानंतर संध्याकाळी फिटनेससाठी जिम आणि बाकीच्या गोष्टी असतात. रात्री ९.३० ला माझा दिवस संपतो.

हेही वाचा : Podar International School : ‘आरटीई’ प्रवेशातून ५३ पालकांची फसवणूक

परीक्षेच्या दिवसात मात्र फक्त शनिवार -रविवारीच टेनिसचा सर्व करते." सृष्टी सांगत होती, " राफेल नदाल हे माझे रोल मॉडेल आहेत. मला त्यांच्यासारखंच वेगवान खेळायला आवडते. मला देशासाठी ग्रँडस्लॅम जिंकायचे आहे.

" सृष्टीचे वडील प्रकाश सूर्यवंशी म्हणाले, " सुरुवातीला माझ्या मोठ्या मुलीला आम्ही काही खेळ शिकवायला पाठवत होतो, नंतर तिचे झुकते माप टेनिसकडे असल्याचे समजले. आम्ही तिला टेनिसचे प्रशिक्षण देत होतो. त्यावेळी सृष्टी ५-६ वर्षांची होती. ती देखील टेनिस खेळू लागली. त्यामुळे आम्ही तिला देखील प्रोत्साहन दिले. आता ती चांगलेच खेळते. आतापर्यंत तिने एकूण १५ पदके जिंकली आहेत. नुकतेच सृष्टीने केवी नॅशनल स्पोर्ट्स मीट मध्ये ब्रांज मेडल जिंकले आहे. तिच्या शाळेकडूनही आम्हाला पूर्ण सहकार्य मिळते."