Pune News : चार वर्षाची मुलगी अडकली स्कूल बसमध्ये; दोन तासानंतर झाली सुटका

कल्याणी नगर येथील बिशप्स स्कूलमध्ये विविध ठिकाणाहून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

Pune News : चार वर्षाची मुलगी अडकली स्कूल बसमध्ये; दोन तासानंतर झाली सुटका
Pune School Bus News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

School News : हडपसर ते कल्याणी नगर यादरम्यान शाळेत (School) जात असताना ४ वर्षाच्या मुलीला स्कूल बसमध्येच (School Bus) झोप लागली. बसमधील महिला सहायक आणि स्कूल बस चालकाने शाळेत गेल्यानंतर सर्व विद्यार्थी बसमधून उतरल्याची शहानिशा न करताच बस शाळेपासून काही अंतरावर उभी केली. काही वेळाने झोपेतून जाग आल्यानंतर मुलीने बसच्या खिडकीच्या काचा वाजवून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना मदतीची आर्त हाक दिली. अखेर एका महिलेने रडणा-या या मुलीला पाहिले आणि तब्बल दोन तासानंतर तिची सुटका झाली. याप्रकरणी पालकांनी येरवडा पोलिसांकडे (Pune police) शाळेविरूध्द तक्रार दिली आहे. 

कल्याणी नगर येथील बिशप्स स्कूलमध्ये विविध ठिकाणाहून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली आहे. स्कूल बस मधील विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी महिला सहायक नेमण्यात आले आहेत. या महिला कर्मचाऱ्यांनी बस मधील विद्यार्थ्यांची काळजी घेणे अपेक्षित आहे. बसमधून शाळेत आलेले सर्व विद्यार्थी खाली उतरले आहेत किंवा नाही हे तपासणे गरजेचे आहे. परंतु, बिशप स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत खबरदारी घेतली नाही. शाळा प्रशासनाने याबाबत गंभीर दखल न घेतल्याने मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

शिक्षक भरती : खासगी संस्थांमधील भरतीसाठी गुणोत्तर बदलले, पारदर्शकता येणार?

मुलीच्या पालक वैशाली मराठे म्हणाल्या, माझी नात गेल्या एक महिन्यांपासून बिशप्स शाळेत बसमध्ये जात आहे. गुरुवारी स्कूल बस चालक व महिला सहायक हे मुलीला शाळेत घेऊन गेले पण त्यांनी तिला शाळेत सोडलेच नाही. शाळेपासून काही अंतरावर असणाऱ्या पुलाखाली बस पार्क करून ते निघून गेले. माझी नात बस मध्ये झोपलेली होती. काही वेळानंतर तिला जाग आली. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना तिने आवाज दिला. परंतु, दरवाजा व गाडीच्या काचा बंद असल्याने अनेकांना तिचा आवाज ऐकू गेला नाही. मात्र एका महिलेने तिला पाहिले. लोकांना गोळा करून तिची सुटका करण्यात आली. त्यानंतर आम्हाला हा प्रकार समजला.

वैद्यकीय भरती : एका मुलीसह तीन परीक्षार्थी अन् तीन केंद्रांनी मिळून केला गैरप्रकार? विभागाकडे दिली नावे

शाळेच्या प्राचार्यांना याबाबत जाब विचारला असता. त्यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले नाही, असे नमूद करून वैशाली मराठे म्हणाल्या, माझी नात गाडीतून खाली उतरली असती किंवा अनोळखी व्यक्ती तिला घेऊन गेले असते तर कोणाला काहीच समजले नसते. प्रत्येक शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांची काळजी घ्यायलाच पाहिजे. इतर मुलांच्या बाबतीत असे काही घडू नये म्हणून मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावर संबंधित स्कूल बस चालक व महिला अटेंडंट यांना कामावरून काढून टाकण्यात आले असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. दरम्यान, याबाबत शाळेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD