Admissions 2023 : इंजिनिअरिंगसाठी दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी, मुदत संपली...

सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी व कागदपत्र अपलोड व पडताळणी तसेच अर्ज निश्चितीसाठी मुदत देण्यात आली आहे.

Admissions 2023 : इंजिनिअरिंगसाठी दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी, मुदत संपली...
CET Cell Admission 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील अभियांत्रिकी (Engineering), कृषीसह (Agriculture) विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Online Admission Process) सध्या सुरू आहे. अभियांत्रिकी पदवीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शुक्रवारी अखेर दिवस होता. तर कृषी अभ्यासक्रमासाठी अद्याप दोन दिवसांचा कालावधी आहे. अभियांत्रिकीसाठी बुधवारपर्यंत (दि. ५) १ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

सीईटी सेलकडून (CET Cell) विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी व कागदपत्र अपलोड व पडताळणी तसेच अर्ज निश्चितीसाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार अभियांत्रिकीसाठी सात जुलैपर्यंत मुदत होती. पाच जुलैपर्यंत १ लाख ६४ हजार ८५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केला आहे. अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांचाच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समावेश केला जातो.

वैद्यकीय भरती : एका मुलीसह तीन परीक्षार्थी अन् तीन केंद्रांनी मिळून केला गैरप्रकार? विभागाकडे दिली नावे

कृषी अभ्यासक्रमासाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत ९ जुलै ही आहे. पाच जुलैपर्यंत जवळपास २१ हजार जणांनी नोंदणी केली असून सुमारे १३ हजार ५०० जणांनी अर्ज निश्चिती केली आहे. तर एमबीएसाठी ३७ हजार जणांनी नोंदणी आणि त्यापैकी १२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केला आहे. एमबीएसाठी १४ तारखेपर्यंत अर्ज निश्चिती करता येणार आहे.

विध, एमसीए व बीपीएड अभ्यासक्रमांसाठीही नोंदणी सुरू आहे. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी पाच तारखेपर्यंत सुमारे ३६ हजार ५०० जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार जणांनी अर्ज निश्चित केला. बीपीएडला यंदाही कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पाच तारखेपर्यंत केवळ साडे चार हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून अडीच हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केली आहे.

UGC च्या निर्णयावरून संभ्रम; सहाय्यक प्राध्यापक पात्रतेबाबत करावा लागला खुलासा

विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन नोंदणीची स्थिती (दि. ५ जुलैपर्यंत) -

अभ्यासक्रम नोंदणी  अर्ज निश्चिती 
अभियांत्रिकी १,६४,८५३ १,२२,१०६
कृषी २०,९७९ १३,४७८
एमबीए ३७,०५९   १२,००१
एमसीए        १६,१३९    ६,४२३
विधी (३वर्षे)    ३७,४५० २३,२८४
बी.पीएड.         ४,४३१  २,४८६

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD