आरटीई प्रवेशास ७ जिल्ह्यात १० हजारापेक्षा जास्त अर्ज

पुणे जिल्ह्यातील १५ हजार ६५५ जागांसाठी तब्बल ७१ हजार २३३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून नागपूर जिल्ह्यात ६ हजार ५७७ जागांसाठी तब्बल ३४ हजार २८८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात नागपूर व पुणे जिल्ह्यातील अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

आरटीई प्रवेशास ७ जिल्ह्यात १० हजारापेक्षा जास्त अर्ज

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबविल्या जात असलेल्या आरटीई प्रवेश (RTE admission) प्रक्रिया चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यातील ७ प्रमुख जिल्ह्यांमध्ये १० हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.तसेच प्रथमच 'आरटीई'साठी अर्ज (application) करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सव्वातीन लाखांचा( out of 3 lakh) आकडा पार केला आहे.

     राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशासाठी येत्या २५ मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पुणे जिल्ह्यातील १५ हजार ६५५ जागांसाठी तब्बल ७१ हजार २३३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून नागपूर जिल्ह्यात ६ हजार ५७७ जागांसाठी तब्बल ३४ हजार २८८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात नागपूर व पुणे जिल्ह्यातील अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

पुणे, नागपूर खालोखाल छ. संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील ४०७३ जागांसाठी १८ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी तर मुंबईत ५ हजार २०२ जागांसाठी १६ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी तर ठाणे जिल्ह्यातील १२ हजार २७८ जागांसाठी २८ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. जळगाव जिल्ह्यातील ३ हजार १२२ जागांसाठी १० हजार ४४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.