CUET UG 2023 : तब्बल २२ हजार विद्यार्थ्यांनी मिळवले १०० टक्के गुण, मराठीतील फक्त तीन

शंभर टक्क्यांपेक्षा अधिक गुण पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषांनमधून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

CUET UG 2023 : तब्बल २२ हजार विद्यार्थ्यांनी मिळवले १०० टक्के गुण, मराठीतील फक्त तीन
CUET UG 2023 Result

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

CUET UG Result 2023 : CUET UG २०२३ परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यंदा ही परीक्षा वेगळ्या वेगळ्या स्थानिक आणि परदेशी अशा ३३ भाषांमध्ये घेण्यात आली होती. विविध विषयांमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २२ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण पटकावले आहे. तर सुमारे ५७ हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण पटकावले आहे. (UGC Declared result of CUET UG 2023)

शंभर टक्क्यांपेक्षा अधिक गुण पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषांनमधून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. इंग्रजीतून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ५ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत तर हिंदी भाषेतून  परीक्षा दिलेल्या १०२ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले. त्या खालोखाल संस्कृत, उर्दू आणि अरेबिक भाषेतून अनुक्रमे ७१, २४ आणि २० विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.

CUET UG २०२३ परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

बंगाली, कन्नड आणि असामी या भाषेतील अनुक्रमे १८, ९ आणि ४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. तर मराठी, उडिया, काश्मिरी आणि तेलगू या भाषेतून परीक्षा दिलेल्या प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. परदेशी भाषांमध्ये सर्वाधिक ५ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण पटकावले आहेत.

जीवशास्त्र विषयात ४ हजार ८५० विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. जीवशास्त्र विषयाच्या पाठोपाठ अर्थशास्त्र आणि बिजनेस स्टडीज या विषयात अनुक्रमे २ हजार ८३६ आणि २ हजार ३५७ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण पटकावले आहेत. तर पॉलिटिकल सायन्स, इतिहास आणि अकौंटन्सी  अँड बुक किपींग या विषयात अनुक्रमे १ हजार ७९६, १ हजार ३६१ आणि १ हजार ७४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण पटकावले आहेत. तर परफॉर्मिंग आर्ट्स, नॉलेज ट्रेडीशन आणि अँथ्रोपॉलॉजी या विषयात प्रत्येकी १ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD