येत्या शैक्षणिक वर्षांपासून पदव्युत्तर पदवी एक वर्षाची; विषय निवडण्याचेही स्वातंत्र्य

UGC च्या नियामक मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)-2020 अंतर्गत तयार केलेल्या पदव्युत्तर  कार्यक्रमासाठी नवीन अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्क मंजूर करण्यात आले आहे.

येत्या शैक्षणिक वर्षांपासून पदव्युत्तर पदवी एक वर्षाची; विषय निवडण्याचेही स्वातंत्र्य
UGC News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

NEP 2020 : देशात प्रथमच २०२४ च्या शैक्षणिक सत्रापासून एक वर्षाची पदव्युत्तर पदवी (Post Graduate Degree) सुरू होणार आहे. पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना एक वर्ष आणि दोन वर्षांच्या पदव्युत्तर शिक्षणाचा पर्याय उपलब्ध  असेल. याशिवाय, पदवीमध्ये ज्या विषयांचा अभ्यास केला जाईल, तेच विषय निवडण्याचे निर्बंधही काढून टाकले जातील. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) चे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार (M Jagdeesh Kumar) यांनी ही माहिती दिली आह.

 

विद्यार्थी CUET-PG-2024 मध्ये त्यांच्या आवडीच्या संबंधित विषयात पात्रता मिळवून मास्टर्सचा अभ्यास करू शकतील. UGC च्या नियामक मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)-2020 अंतर्गत तयार केलेल्या पदव्युत्तर  कार्यक्रमासाठी नवीन अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्क मंजूर करण्यात आले आहे. हा मसुदा या आठवड्यात राज्ये आणि विद्यापीठांना पाठवला जाणार असल्याचे जगदीश कुमार यांनी म्हटले आहे. 

नवप्राध्यापकांचे आता उपोषणास्त्र; उच्च शिक्षण विभागाला दिला इशारा

 

नवीन अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्क अंतर्गत, चार वर्षांच्या यूजीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या पदव्युत्तर पदवीचा पर्याय मिळेल. याशिवाय तीन वर्षांचा यूजी प्रोग्राम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा मास्टर्सचा अभ्यास  करावा लागेल. याशिवाय नवीन नियमांनुसार आता विद्यार्थ्यांना अभ्यासाचे माध्यम बदलण्याचा पर्यायही मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑफलाइन, ओडीएल (दूरस्थ शिक्षण), ऑनलाइन लर्निंग आणि हायब्रीडच्या माध्यमातून त्यांच्या सोयीनुसार अभ्यास करता येणार आहे.

 

नवीन अभ्यासक्रमात बहुविद्याशाखीय अभ्यासाची सुविधा असेल. नव्या नियमांमधील हा सर्वात मोठा बदल आहे. उदाहरणार्थ, चार वर्षांच्या यूजी प्रोग्राममध्ये, जर एखाद्या विद्यार्थ्याने भौतिकशास्त्र हा मुख्य विषय म्हणून आणि अर्थशास्त्र हा  दुसरा  विषय म्हणून अभ्यास केला असेल, तर आता तो मास्टर्समध्ये प्रमुख आणि इतर  विषयांपैकी कोणताही विषय निवडण्यास सक्षम असेल.

 

जर एखाद्या विद्यार्थ्याला मास्टर्समध्ये स्ट्रीम  बदलायचा असेल तर तो पर्यायही उपलब्ध असेल. वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या UG विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मास्टर्स करायचे असल्यास, त्यांना त्या विषयात CUET PG 2024 किंवा इतर कोणत्याही प्रवेश प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO