Marathwada University : जप्ती टाळण्यासाठी शासनाकडून भूधारकांना दीड कोटींचा वाढीव मोबदला

नांदेड उपकेंद्रासाठी पांगरी व विष्णुपुरी येथील विविध भूधारकांच्या जमीनी संपादित केल्या आहेत. या उपकेंद्राचे विद्यापीठात रुपांतर झाले असून या जमीनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वापरात आहेत.

Marathwada University : जप्ती टाळण्यासाठी शासनाकडून भूधारकांना दीड कोटींचा वाढीव मोबदला
Marathwada University

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या (Marathwada University) नांदेड उपकेंद्रासाठी संपादित केलेल्या जमिनीची वाढीव मोबदला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने (High Court) दिले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी नांदेड येथील दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाविरुध्द अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच दुसरे सह दिवाणी न्यायालय, वरिष्ठस्तर यांनी जप्ती आदेश निर्गमित केले आहेत. त्यानंतर राज्य शासनाने (Maharashtra Government) जप्ती टाळण्यासाठी तातडीने संबंधित भूधारकांसाठी १ कोटी ५० लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. (Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded)

उच्च शिक्षण विभागाकडून याबाबतचा जीआर जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, नांदेड उपकेंद्रासाठी पांगरी व विष्णुपुरी येथील विविध भूधारकांच्या जमीनी संपादित केल्या आहेत. या उपकेंद्राचे विद्यापीठात रुपांतर झाले असून या जमीनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वापरात आहेत.

शिक्षकांचा आता निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार

भूधारकांनी जमीनीचा मोबदला अत्यल्प असल्याने वाढीव मावेजा मिळण्यासाठी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर येथे एकुण ०८ एलएआर प्रकरण दाखल केले होते. न्यायालयाने प्रकरण निहाय प्रती हेक्टर मोबदला देण्याचे आदेश पारित केले होते. या निकालाविरुद्ध संबंधित भूधारकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले होते. न्यायालयाने पहिले अपील मंजूर करून प्रति हेक्टर १ लाख ७५ हजार रुपये या दराने वाढीव मावेजा देण्याचे आदेशित केले आहे.

यानंतर उच्च न्यायालयाने देण्यास सांगितलेल्या वाढीव मावेजाची अंमलबजावणीसाठी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर येथे विद्यापीठाविरूध्द रेग्युलर दरखास्त दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच दुसरे सह. दिवाणी न्यायालय, वरिष्ठस्तर यांनी जप्ती आदेश निर्गमित केले आहेत. आदेशाच्या अनुषंगाने जप्ती आदेश टाळण्याकरीता वाढीव मावेजापोटी द्यावयाची १ कोटी ५० लाख ८९ हजार ६५४ रुपये विद्यापीठास उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या निधीला शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे, असे जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Talathi Bharti : विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल शासनाने व्यक्त केली दिलगिरी

त्यानुसार आठ भूधारकांमध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे. त्यामध्ये ७३ लाख ३९ हजार ५४६ रुपयांचा मोबदला विठ्ठल मारोती हंबर्डे यांना मंजूर झाला आहे. आनंदा गंगाराम हंबर्डे यांना २५ लाख ७० हजार ३०२ रुपये, बाबुराव नागोराव हंबर्डे, भिमराव नागोराव हंबर्डे आणि गोविंद व्यंकटराव हंबर्डे यांना ६ लाख १४ हजार ६४७ रुपये उर्वरित मावेजा मिळणार आहे. तर गोविंद हंबर्डे यांना २५ ख १५ हजार ३६९ रुपयांचा मोबदला मिळणार आहे. बाळासाहेब नागोराव हंबर्डे यांना १८ लाख ४९ हजार ८६१ आणि गोविंद माधवराव हंबर्डे यांना १ लाख ९९ हजार ९२९ रुपये असा एकूण १ कोटी ५० लाख ८९ हजार ६५४ रुपयांचा मोबदला वितरित केला जाणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo