भरती परीक्षेत हिजाब, कुंकू आणि मंगळसूत्रावरून वाद; ड्रेसकोडचे राजकारण तापलं

परीक्षेसाठी KEA ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, हिजाब घालण्यावर कोणतीही स्पष्ट बंदी नव्हती, परंतु डोके झाकण्यापासून ते पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्यास मनाई होती.

भरती परीक्षेत हिजाब, कुंकू आणि मंगळसूत्रावरून वाद; ड्रेसकोडचे राजकारण तापलं

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या (KEA ) भरती परीक्षेत हिजाब, कुंकू आणि जोडव्यांवरून वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपुर्वी झालेल्या भरती परीक्षेदरम्यान (Recruitment Exam) एका महिलेला मंगळसूत्र काढण्यास सांगितले होते. त्यानंतर हिंदू गटांनी तीव्र विरोध केला होता तर परीक्षेत  हिजाब वापरण्यावर बंदी आणल्यामुळे विद्यार्थ्यांकडून रोष व्यक्त केला जात होता. (Politics over Hijab)

 

परीक्षेसाठी KEA ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, हिजाब घालण्यावर कोणतीही स्पष्ट बंदी नव्हती, परंतु डोके झाकण्यापासून ते पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्यास मनाई होती. कॉपी टाळण्यासाठी असे सांगण्यात आले मात्र या नियमांना विद्यार्थ्यांकडून विरोध सुरु झाला. हे पाहता यावेळी महिलांना दागिन्यांच्या नावावर फक्त मंगळसूत्र आणि जोडवे घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. हिजाब बंदीला विरोध केल्यानंतर हिजाब वापरण्यावर  परवानगी देण्यात आली आहे, परंतु अशा उमेदवारांना वेळेपूर्वी केंद्रावर पोहोचावे लागेल. अशा परिस्थितीत संबधीत विद्यार्थिनींची  कसून तपासणी केल्यानंतर ती परीक्षा देऊ शकेल, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

नवप्राध्यापकांचे आता उपोषणास्त्र; उच्च शिक्षण विभागाला दिला इशारा

 

दरम्यान काही दिवसांआधी कर्नाटक सरकारने हिजाब घालण्याची परवानगी दिली होती, परंतु त्यानंतर अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ज्यामध्ये असे आढळून आले की अनेक उमेदवारांनी हिजाबच्या आत ब्लूटूथ वापरला आहे. या संदर्भात तपासणी केली असता दोन केंद्रांवर उमेदवारांकडून ब्लूटूथचा वापर केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कर्नाटक सरकारने पुन्हा हिजाबवर बंदी घातली होती. 

 

KEA परीक्षा १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे.  यासाठी परीक्षा प्राधिकरणाने ड्रेस कोडपासून ते मार्गदर्शक तत्त्वांपर्यंत सर्व काही जारी केले आहे. दरम्यान, यावरून राजकारण सुरू झाले आहे. कर्नाटक सरकारनेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. परीक्षेसाठी आधीपासून ड्रेसकोडबाबत निर्णय घेतले जात आहेत. हा निर्णय नवीन नाही. हिजाब वापरण्यास परवानगी असली तरी गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षेपुर्वी त्यांची कसून तपासणी केली जाईल.  त्यासाठी विद्यार्थ्यांना किमान दोन तास आधी परीक्षा केंद्रांवर दाखल व्हावे लागणार आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO