कोटातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांवर थेट पीएचडी; या तीन महत्वाच्या शिफारशी थांबवतील आत्महत्या?

कोटा येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख दिनेश शर्मा यांनी हे संशोधन करून कोटाच्या जिल्हा प्रशासनाला सादर केले आहे.

कोटातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांवर थेट पीएचडी; या तीन महत्वाच्या शिफारशी थांबवतील आत्महत्या?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

कोचिंग हब (Coaching Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा (Kota) येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा नेहमीच चिंतेचा मुद्दा राहिला आहे. राजकीय नेत्यांसह, शैक्षणिक संस्था, पोलीस, पालकांमध्ये अनेकदा चर्चा होतात, पण त्यातून मार्ग निघत नाही. आता हा मुद्दा एवढ्यावर थांबलेला नाही तर त्यावर संशोधनही (Research) झाले आहे. एका मानसशास्त्रज्ञांनी त्यावर पीएचडी (Phd) केली आहे.

 

कोटा येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख दिनेश शर्मा यांनी हे संशोधन करून कोटाच्या जिल्हा प्रशासनाला सादर केले आहे. कोटामध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांच्या कोचिंगसाठी दरवर्षी सुमारे अडीच लाख विद्यार्थी येत असतात. पण अभ्यासाचा ताण, सराव परीक्षांमुळे मिळणारे कमी गुण आदी कारणांमुळे अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत ढकलले जातात. त्यातील काही जण आत्महत्या करतात.

विद्यार्थ्यांचे डोळे 'कमवा व शिका' योजनेच्या मंजुरीकडे; विद्यापीठाच्या मंजूरीला एक महिना विलंब

 

यापार्श्वभूमीवर शर्मा यांनी ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले होते. त्यानंतर त्यांनी या विषयावर पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. मागील महिन्यांतच त्यांनी संशोधन पूर्ण करून जिल्हा प्रशासनाला प्रबंध सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत. या वर्षभरात २३ विद्यार्थ्यांनी कोटामध्ये आत्महत्या केल्या असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. मागील वर्षी १५ जणांनी आत्महत्या केली होती.

 

संशोधनाविषयी ‘पीटीआय’शी बोलताना शर्मा म्हणाले, विद्यार्थ्यांचे समुपदेशन करताना जाणवले की, या मुद्दावर खोलवर अभ्यासच झालेला नाही. कोचिंग संस्थांशी चर्चा करून दहा मुद्दे ठरविण्यात आले. त्यामध्ये वय, लिंग, कुटुंब म्हणजे एकत्रित की विभाजित, निवास, कुटुंबाची आत्महत्या किंवा नैराश्याबाबतची पार्श्वभूमी, कुटुंबाचे मासिक उत्पन्न आदी मुद्यांचा समावेश करण्यात आला. मुलांशी संवाद साधत त्यांच्यावरील ताण वाढविण्यात या बाबींचा किती वाटा आहे, हेही अभ्यासण्यात आले.

ना अभ्यासक्रम, ना वर्ग, गणवेश अन् बेंचही नाहीत! मधुराणी प्रभुलकर यांची मुलगी शिकते या शाळेत

 

दिनेश शर्मा यांनी केलेल्या तीन महत्वाच्या शिफारशी

१. कोचिंगच्या सुरूवातीच्या काळात खासगी संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी रॅंकिंग पध्दत असू नये. प्रत्येक कमी गुण विद्यार्थ्यांची रॅंक कमी करतो. रॅंकऐवजी श्रेणी पध्द सुरू करायला हवी. मुख्य परीक्षेत रँकिंग असले ती खूप लांबचा पल्ला असतो. तोपर्यंत विद्यार्थी हळूहळू मानसिकदष्ट्या तयार होऊ शकतात.

 

२. कोचिंग संस्थांनी विद्यार्थ्यांकडून एकदम शुल्क न देता टप्प्याटप्यांमध्ये घ्यावे. बहुतेक संस्था आधीच सर्व सर्व किंवा दोन टप्प्यात शुल्क घेतात. दोन महिन्यानंतर विद्यार्थ्यांना क्लास सोडायचा असेल तर विद्यार्थी कुटुंबावर पडलेल्या आर्थिक बोजामुळे तिथेच थांबतात. पैसे वाया जातील या भीतीने विद्यार्थी इच्छा नसतानाही क्लासमध्ये थांबणार नाहीत.

 

३. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार त्यांची वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागणी करू नये. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा येऊ शकते. हुशार विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी एकत्रच शिकायला हवेत. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकेल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j