‘सरहद’ मध्ये भरला विद्यार्थ्यांचा मेळा

तरुणाईने उद्यम (उद्योग नियोजन) पहेचान कौन (प्रश्नमंजुषा),  क्रिएटिव्ह आणि मॅड ऍड या स्पर्धांमध्ये  सहभाग घेतला आणि पारितोषिके मिळविली. स्पर्धेच्या शेवटी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

‘सरहद’ मध्ये भरला विद्यार्थ्यांचा मेळा
Sarhad College Competition

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुण्यातील सरहद कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (Sarhad College) येथे वाणिज्य विभागातर्फे दुसऱ्या ‘सरहद कॉमर्स डायमेन्शन’ या राष्ट्रीय स्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे (Sarhad Commerce Dimension) आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील (Students) विविध कौशल्यांचा विकास घडविणे आणि इतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची इतर संस्थांमधील समन्वयकासह स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करणे, या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील व इतर महाविद्यालयातील एकूण २९७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व समुपदेशक वैशाली चव्हाण व माजी विद्यार्थी संकेत टावरी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. वैशाली चव्हाण व उपप्राचार्य डॉ. संगीता शिंदे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

हेही वाचा : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची थकबाकी मिळणार; शिंदे सरकारकडून शिक्कामोर्तब

तरुणाईने उद्यम (उद्योग नियोजन) पहेचान कौन (प्रश्नमंजुषा),  क्रिएटिव्ह आणि मॅड ऍड या स्पर्धांमध्ये  सहभाग घेतला आणि पारितोषिके मिळविली. स्पर्धेच्या शेवटी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या प्रसंगी सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, सरहद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत जाधवर, उपप्राचार्य डॉ. संगीता शिंदे आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शितल लकडे उपस्थित होत्या.

विविध स्पर्धांसाठी वैशाली चव्हाण, कला शाखा व मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. वंदना चव्हाण,  संख्याशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका अश्विनी काळे आणि बीबीए विभागाच्या डॉ. स्वप्ना थोरगुले हे परीक्षक  म्हणून लाभले. प्रथम वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.  वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2