NEET EXAM: नीट परीक्षेत केमिस्ट्री अवघड, कट ऑफ वाढणार!

मागील वर्षापेक्षा यंदा नीट परीक्षेचा कट ऑफ वाढणार आहे. तसेच महाराष्ट्रात काही नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यामुळे यंदा प्रवेशाच्या जागा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

NEET EXAM: नीट परीक्षेत केमिस्ट्री अवघड, कट ऑफ वाढणार!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी MBBS Medical Admission  घेतली जाणारी नीट परीक्षा Neet Exam रविवारी सुरळीतपणे पार पडली.यंदा नीट परीक्षेची काठीण्य पातळी मागील दोन-तीन परीक्षांएवढीच होती. विद्यार्थ्यांना केमिस्ट्री विषयाचे काही प्रश्न अवघड गेले. मात्र, सर्व विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेले.परंतु, यावर्षी निकाल चांगला लागणार असल्याने नीट परीक्षेचा 'कट ऑफ' (Neet exam cut off) वाढलेला दिसेल, असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

    नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व पालकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. प्रामुख्याने पुणे शहरातील केंद्रीय विद्यालये आणि सीबीएसई बोर्डाच्या नामांकित शाळांमध्ये नीटचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते.त्यात लोहगाव येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक १ व क्रमांक २ तसेच इंद्रायणी नगर आणि मोशी येथील प्रियदर्शनी स्कूल आदी परीक्षा केंद्रांचा समावेश होता. पुणे शहरात सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नीट परीक्षा केंद्राच्या सेंटर सुप्रिटेंट डॉ. गायत्री जाधव म्हणाल्या, दरवर्षीपेक्षा यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. विद्यार्थ्यांची उपस्थिती सुद्धा यंदा चांगली होती. प्रियदर्शनी स्कूल या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर त्याचे पालक आले होते.विद्यार्थी व पालक या सर्वांची उत्तम व्यवस्था केंद्रातर्फे करण्यात आली होती.

डिपार संस्थेचे प्रमुख व प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक हरीश बुटले म्हणाले, बायलॉजी व फिजिक्सचे प्रश्न तुलनेने सोपे होते. परंत, झूलॉजीचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचार करण्यास लावणारे होते. तर केमिस्ट्री विषयाचे काही प्रश्न ट्विस्टी होते. त्यामुळे केमिस्ट्रीचा पेपर विद्यार्थ्यांना काहीसा अवघड गेला. परंतु, मागील वर्षापेक्षा यंदा कट ऑफ वाढणार आहे. तसेच महाराष्ट्रात काही नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यामुळे यंदा प्रवेशाच्या जागा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

--------------

"नीट परीक्षेची काठीण्य पातळी यंदाही मागील दोन तीन परीक्षांसाखीच होती. विद्यार्थ्यांना बायोलॉजी विषयी सोपा गेला. फिजिक विषय सर्वसाधारण होता.तर केमिस्ट्री विषयाचे काही प्रश्न गुंतागुंतीचे होते. परंतु सर्वसाधारणपणे पेपर चांगला होता."

- दुर्गेश मंगेशकर, प्रमुख,आयटीआयन्स