छेड काढणाऱ्याच्या डोळ्यात विद्यार्थिनीने टाकली मिरची: जयकर रीडिंग हॉलमधील घटना

शुक्रवारी नियमितपणे रीडिंग हॉलमधील चौथ्या मजल्यावर ती अभ्यास करण्यासाठी आली.त्या मुलाने पुन्हा छेड काढल्याने तिने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून , चोप देऊन त्याला धडा शिकवला.

छेड काढणाऱ्याच्या डोळ्यात विद्यार्थिनीने टाकली मिरची: जयकर रीडिंग हॉलमधील घटना

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) जयकर ग्रंथालयाच्या (jaykar library) अभ्यासिकेत (reading hall) एका मुलीने छेड काढणाऱ्या मुलाच्या डोळ्यात मिरची फेकल्याचा (girl threw chili powder in the eyes) धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. संबंधित मुलीने अद्याप याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे किंवा पोलिसांकडे तक्रार दिली नसली तरी घडलेल्या घटनेबाबत विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.


      विद्यापीठातील जयकर ग्रंथालयांच्या नवीन इमारतीमधील रीडिंग हॉलमध्ये विविध विभागांमधील तसेच स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अभ्यास करतात. मात्र, त्यातीलच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा एक मुलगा विद्यापीठाच्या विभागामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीला त्रास देत होता.तिला इशारे करत होता. सातत्याने हा प्रकार घडत असल्याने या मुलीने त्याला धडा शिकविण्याचे ठरवले. शुक्रवारी नियमितपणे रीडिंग हॉलमधील चौथ्या मजल्यावर ती अभ्यास करण्यासाठी आली.त्या मुलाने पुन्हा छेड काढल्याने तिने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून व चोप देऊन त्याला धडा शिकवला, असे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी सांगितले.
      गेल्या चार-पाच दिवसात जयकर ग्रंथालयात मुलींची छेडछाड काढण्याची ही दुसरी घटना आहे. एका मुलीने यापूर्वी छेड काढणाऱ्या मुलाला चोप दिला होता. या दोन घटनांवरून विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या सावित्रीच्या लेकी आता कोणी त्रास दिल्यावर शांत बसत नाही तर त्याला चांगलाच धडा शिकवतात, असे दिसून येत आहे.
    जयकर ग्रंथालयाच्या रीडिंग हॉलमध्ये गजबजलेल्या ठिकाणी, अशा प्रकारची घटना घडल्यामुळे बघ्याची यांची गर्दी झाली होती. घडलेला प्रकार समजल्यानंतर या ठिकाणी विद्यापीठातील सुरक्षा कर्मचारी दाखल झाले होते. संबंधित विद्यार्थ्यांना तक्रार लिहून देण्याबद्दल सांगण्यात आले होते. परंतु, संबंधित विद्यार्थ्यांनीने अद्याप तक्रार दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.