भारतीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण अडसूळ

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र व कार्यशाळा भारतीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजित केल्या जातील,असे डॉ. अरूण अडसूळ यांनी सांगितले.

भारतीय शिक्षण संस्थेच्या  अध्यक्षपदी डॉ. अरुण अडसूळ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय शिक्षण संस्थेच्या (Indian Institute of Education) अध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ (Dr Arun Adsul) यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुढील पाच वर्षासाठी त्यांच्याकडे अध्यक्ष पद राहणार आहे.                                

नामवंत शिक्षणतज्ञ जे. पी. नाईक यांनी भारतीय शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व विकासासाठी विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ चित्रा नाईक यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींनी या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे.    

   डॉ. अरुण अडसूळ म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र व कार्यशाळा भारतीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजित केल्या जातील. तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जातील.