बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर; आझाद मैदानावरी आंदोलनाला मिळाले यश

बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.

बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर; आझाद मैदानावरी आंदोलनाला मिळाले यश

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) barti वतीने  देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप Fellowship देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath shinde यांनी घेतला. बार्टी, सारथी, sarthi टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश शिंदे यांनी बुधवारी दिले. तसेच या बाबतची माहिती ट्विटरद्वारे प्रसिद्ध केली 

बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता समान धोरण तयार करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि  शिष्टमंडळाचे प्रतिनीधी उपस्थित होते. यावेळी ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य केली. या निर्णयाचे स्वागत करून विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मांडला.

फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून बार्टी, सारथी, टीआरटीआय,महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश दिले.