नोकरदार, गृहिणी, व्यावसायिकांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; ‘सूर्यदत्त’चा उपक्रम

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन तर्फे लाइफलॉंग लर्निंग उपक्रमांतर्गत विविध घटकांना उच्च शिक्षणासाठी ७५ लाखाची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

नोकरदार, गृहिणी, व्यावसायिकांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; ‘सूर्यदत्त’चा उपक्रम


एज्यूवार्ता न्यूज नेटवर्क


विद्यार्थी (Students), नोकरदार, गृहिणी तसेच व्यावसायिकांना शिष्यवृत्तीद्वारे शिक्षण (Education) घेण्याची मोठी संधी मिळणार आहे. होतकरू, शिक्षण अर्धवट राहिले किंवा उच्च शिक्षण (Higher Education) पूर्ण होऊनही अल्प कालावधीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम करण्याची इच्छा असणाऱ्यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या (Suryadatta Education Foundation) वतीने पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती (Scholarship) दिली जाणार आहे.


सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन तर्फे लाइफलॉंग लर्निंग उपक्रमांतर्गत विविध घटकांना उच्च शिक्षणासाठी ७५ लाखाची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती सूर्यदत्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सल्लागार डॉ. शैलेश कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.


शिष्यवृत्ती अंतर्गत पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी व प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करता येतील. यासाठी सूर्यदत्त संस्थेच्या कोणत्याही महाविद्यालयात वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २२ ते ५० यादरम्यान असावे. 
इच्छुकांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी www.suryadatta.org या लिंकवरून अर्ज करता येतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जुलै आहे. त्यानंतर उमेदवारांनी केलेल्या अर्जाची छाननी होऊन आणि होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी १० ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे. 
----------------------------------