CBSE  दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी  LOC फॉर्ममध्ये सुधारणा करण्याची संधी

अर्जामध्ये स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. 

CBSE  दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी  LOC फॉर्ममध्ये सुधारणा करण्याची संधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

CBSE दहावी- बारावी बोर्ड परीक्षा अगदी काही दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डाने विद्यार्थ्यांना लिस्ट ऑफ कॅन्डीडेट फॉर्म (LOC) मध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. CBSE ने parikshasangam.cbse.gov.in वर इयत्ता दहावी- बारावीच्या  विद्यार्थ्यांसाठी उमेदवारी फॉर्मच्या यादीत सुधारणा करण्यासाठी विंडो उपलब्ध करून दिली आहे. 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने उमेदवारांच्या फॉर्मची यादी प्रसिद्ध केली होती.दहावी- बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी LOC फॉर्म भरणे बंधनकारक होते. आता या फॉर्ममध्ये दुरुस्तीही करता येईल.

हेही वाचा : जेईई परीक्षेचे नियम झाले आणखी कडक

CBSE ने parikshasangam.cbse.gov.in वर इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उमेदवारी फॉर्मच्या यादीत सुधारणा करण्यासाठी विंडो उपलब्ध करून दिली आहे. यासाठी शाळांना ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे, तर अर्जात दुरुस्ती करणाऱ्या विद्यार्थ्यांना १००० रुपये जमा करावे लागणार आहेत. अर्जामध्ये स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.  मात्र नावे लिहिताना काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करता येतील, असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.